शाकिब अल हसन बांगलादेशच्या कर्णधारपदी परतला,स्टंप वादातून नव्याने सुरुवात

2009 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये मशरफी मोर्तझा जखमी झाल्यानंतर त्याची पहिल्यांदा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
 shakib al hasan
shakib al hasan sakal
Updated on

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला आपला नवा कसोटी कर्णधार म्हणून निवड केली आहे. आधी पासूनच बांगलादेश क्रिकेट बोर्ड शाकिबकडे पुन्हा कसोटी कर्णधारपद सोपवण्याचा विचार करत होता. 2 जून रोजी त्यांनी पुन्हा एकदा या दिग्गज खेळाडूकडे कर्णधारपद सोपवले आहे.

 shakib al hasan
गदाधारी सुरेश रैना! चाहते म्हणाले, तरी ही धोनी संघात घेणार...

शाकिबच्या जागी 2019 मध्ये मोमिनुल हकला कर्णधार बनवण्यात आले होते. श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर त्याने पदाचा राजीनामा दिला होता. बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मोमिलनुकचा राजीनामा स्वीकारला आहे, आणि तिसऱ्यांदा शाकिबला निवडला आहे. लिटन दासला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. याआधी शाकिब अल हसन कडे उपकर्णधारपद होते. दासने अलीकडच्या काळात आपल्या दमदार फलंदाजीने अनेकांची मने जिंकली असून त्यामुळे त्याला महत्त्वाची भूमिका दिली आहे.

 shakib al hasan
श्रेयस अय्यरचा सुपरसिक्सर, विकत घेतली करोडो रुपयांची मर्सिडीज; पहा फोटो

शाकीब अल हसन दोनदा कर्णधार बनला आहे. 2009 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये मशरफी मोर्तझा जखमी झाल्यानंतर त्याची पहिल्यांदा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 2017 मध्ये मुशफिकर रहीमच्या जागी त्याला कमांड देण्यात आली. जून 2021 मध्ये ढाका प्रीमियर लीग सामन्यादरम्यान शाकिब देखील वादात सापडला होता जेव्हा त्याने अंपायरच्या निर्णयावर रागाच्या भरात लाथ मारून स्टंप तोडला होता. मात्र, यासाठी त्यांना जाहीर माफी मागावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.