Mohammad Hafeez : कर्णधारालाच विचारा... पराभवानंतर हाफिजनं हात झटकले, प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळं सांगितलं

Mohammad Hafeez On Aamer Jamal
Mohammad Hafeez On Aamer Jamal esakal
Updated on

Mohammad Hafeez On Aamer Jamal : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा कसोटी मालिकेत 3 - 0 असा पराभव करत व्हाईट वॉश दिला. पाकिस्तानला तीन पैकी एकाही कसोटीत चांगली कामगिरी करता आली नाही. सिडनी कसोटीत पाकिस्तान संघाने थोडाफार प्रतिकार केला. कसोटी पदार्पण करणाऱ्या आमेर जमालने गोलंदाजी आणि फलंदाजीत देखील चमक दाखवली.

Mohammad Hafeez On Aamer Jamal
SL vs ZIM ODI : सामना सुरू होण्याच्या काही तास आधी संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल अन्...

दरम्यान, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 130 धावांची गरज होती त्यावेळी स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला प्राथमिकता न देता इतर गोलंदाजांना संधी देण्यात आली. याबाबत संघाचे क्रिकेट डायरेक्टर मोहम्मद हाफिजला प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने हात वर करत हा निर्णय कर्णधाराचा होता त्यालाच विचारा असं सांगितलं. सहसा प्रेस कॉन्फरन्समध्ये संघातील टॅक्टिकल निर्णयाची चर्चा केली जात नाही. मात्र हा संकेत हाफिजने पाळला नाही.

Mohammad Hafeez On Aamer Jamal
Ranji Trophy 2024 : मुंबईविरूद्धच्या सामन्यात बिहारच्या दोन प्लेईंग 11... सामना सुरू होण्यात झाला विलंब

पाकिस्तानचा सर्वात चांगला गोलंदाज आमेर जमालला लवकर गोलंदाजी का दिली नाही असं विचारण्यात आलं त्यावेळी त्याने सांगितले की, 'सर्व गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी उपलब्ध होते. मात्र हा कर्णधाराचा टॅक्टिकल निर्णय होता.'

'आम्ही ऑफ स्पिनरकडून जास्त गोलंदाजी करवून घेतली कारण खेळपट्टी फिरकीला पोषक होती. मात्र बाकीचे निर्णय हे शान मसूदचे होते. त्यालाच विचारा. माझ्या मते जमालने लवकर गोलंदाजीला यायला हवं होतं. मात्र मैदनात कॅप्टनच निर्णय घेत असतो. त्यामुळे तुम्ही त्यालाच विचारा'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.