थायलंड : शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर 24 तासांनंतर डॉक्टरांनी नवा खुलासा केला आहे. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज वॉर्नला बेशुद्ध पडल्यानंतर ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, तिथल्या डॉक्टरांनी हा खुलासा केला आहे. रुग्णालयात पोहोचल्यानंतर वॉर्नला सुमारे अर्धा तास औषध देण्यात आल्याचं रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितले.
मात्र त्यानंतरही त्यांना वाचवता आलं नाही कारण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं. वॉर्नने शुक्रवारी थायलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला. या महान स्पिनरच्या निधनाने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे.
थाई इंटरनॅशनल रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक दुल्याकित विट्टायाचानायपोंग म्हणाले, “त्यांना 45 मिनिटांसाठी सीपीआर देण्यात आला. ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी नंतर असा निष्कर्ष काढला की, त्यांनी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अखेरचा श्वास घेतला होता." वॉर्न 52 वर्षांचे होते. फॉक्स स्पोर्ट्स टेलिव्हिजनने कौटुंबिक निवेदनाचा हवाला देत म्हटलं आहे की, वॉर्न यांचा मृत्यू थायलंडमधील कोह सामुई येथे झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.