शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत थायलंड पोलिसांनी एक निवेदन जारी केलंय.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या (Shane Warne) थायलंडमध्ये झालेल्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरूय. आज (सोमवार) थायलंड पोलिसांनी (Thailand Police) शेन वॉर्नच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची (Shane Warne Death Postmortem Report) माहिती सर्वांना दिलीय. शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यात अद्याप कोणताही संशयास्पद प्रकार आढळला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
आज (सोमवार) थायलंड पोलिसांनी एक निवेदन जारी केलंय. 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना शेन वॉर्नचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाला आहे. यामध्ये वॉर्नचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचं वैद्यकीय मत आहे. यानुसार पोलिस लवकरच वकिलांशी बोलणार असल्याचं समजतंय. 52 वर्षीय शेन वॉर्न सुट्टीसाठी थायलंडला गेला होता. 4 मार्च रोजी सायंकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. शेन वॉर्न एका व्हिलामध्ये राहत होता, तिथं खोलीत त्याला हृदयविकाराचा झटका आला. वॉर्नला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात (Hospital) नेण्यात आलं. मात्र, त्याचा मृत्यू झाला.
थायलंड पोलिसांनी सुरुवातीलाच कोणतंही गैरकृत्य नसल्याचं म्हंटलं होतं. परंतु, त्यांना पोस्टमॉर्टम अहवालाची प्रतीक्षा होती. पोलिसांनी शेन वॉर्नच्या तीन मित्रांचीही चौकशी केली होती. शेन वॉर्नच्या मॅनेजरचं वक्तव्यही आता समोर आलंय. वॉर्नचे व्यवस्थापक जेम्स एर्स्काइन (James Erskine) यांनी खुलासा केलाय की, ऑस्ट्रेलियन महान फिरकीपटू सुट्टीवर जाण्यापूर्वी दोन आठवडे फक्त द्रव घेत होता, त्याच्या छातीतही दुखत होतं आणि वॉर्नला सारखा घाम येत होता. एर्स्काइननं 'नाईन नेटवर्क'ला सांगितलं, की शेन वॉर्न विचित्र पध्दतीचा आहार घेत होता. त्यात द्रवाचं (बिअर, दारु) प्रमाण अधिक होतं. तो 14 दिवस फक्त द्रवपदार्थ घेत होता. तसेच सिगारेट ओढण्याचं प्रमाणही सर्वाधिक होतं, त्यामुळेच कदाचित शेन वॉर्नला हृदयविकाराचा झटका आला असावा, असा दावा त्यांनी केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.