जर्मन महिलेमुळे शेन वॉर्नच्या मृत्यूचं वाढलं गुढ; थायलंड पोलीस चौकशी सुरू

Shane Warne Death German woman in Ambulance
Shane Warne Death German woman in Ambulance esakal
Updated on

जगातील महान फिरकीपटूंपैकी एक असलेल्या शेन वॉर्नचा (Shane Warne) अवघ्या 52 व्या वर्षी थायलंडमध्ये मृत्यू झाला. मात्र त्याच्या मृत्यूचे गुढ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याच्या व्हिलामध्ये रक्ताचे डाग आढळून आल्यानंतर आता शेन वॉर्नचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेताना रूग्णवाहिकेत एका जर्मन महिलेने (German woman) प्रवेश केला होता. थायलंड पोलीस (Thailand Police) या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

Shane Warne Death German woman in Ambulance
Video: समालोचक संजय मांजरेकरांचे 'सिंगिंग टॅलेंट' होतयं व्हायरल

शेन वॉर्नच्या मृतदेह शवविच्छेदन (Autopsy) करण्यासाठी रूग्णवाहिकेतून नेत असताना एक जर्मन महिला फुलांचा गुच्छ घेऊन रूग्णवाहिकेच्या जवळ उभी असलेला फोटो व्हायरल झाला होता. ती रूग्णवाहिकेत गेल्याने चर्चेत देखील आली होती. ती शेन वॉर्नची मोठी फॅन असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता या प्रकरणाची थायलंड पोलीस चौकशी करणार आहेत.

न्यूज डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार जर्मन महिलेने 40 सेकंदासाठी शेन वॉर्नचा मृतदेह (Shane Warne Dead Body ) ठेवलेल्या रूग्णवाहिकेत प्रवेश केला होता. ही सुरक्षेतील कमतरता मानली जात आहे. या महिलेच्या हातात फुलांचा एक गुच्छ होता. या महिलेमुळे शेन वॉर्नच्या मृत्यूबाबतचे गुढ अजूनच वाढले आहे. यावेळी स्थानिक किंवा ऑस्ट्रेलियन पोलीस तेथे उपस्थित नव्हते. ही रूग्णवाहिका थांबवण्यात आली होती. त्यावेळी ही महिला रूग्णवाहिकेत चढली.

Shane Warne Death German woman in Ambulance
शेन वॉर्न हा काही सर्वोत्तम फिरकीपटू नव्हता : सुनिल गावसकर

काही वृत्तानुसार थायलंडचे पोलीस या जर्मन महिलेची (German woman) चौकशी करत आहेत. ही महिला कोह सामुई येथेच राहेत. थायलंडच्या अधिकाऱ्यांनी ही महिला शेन वॉर्नला वैयक्तिकरित्या ओळखत होती असाही दावा केला आहे. त्यामुळेच या महिलेला शेन वॉर्नला शेवटची श्रद्धांजली वाहण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. यावेळी या महिलेचे स्थानिक इमिग्रेशन ऑफिसर बरोबर चर्चा करतानाचे फुटेजही शेअर करण्यात आले आहे. या फुटेजमध्ये महिला इमिग्रेशन अधिकारी ती महिला त्याला ओळखत होती असे इंग्रजीत सांगते त्यानंतर ती अधिकारी थाईमध्ये धन्यवाद ती त्याची मैत्रिण होती असेही बोलते. स्थानिक प्रशासनाने यापूर्वी शेन वॉर्नच्या मृत्यूमागे कोणतेही गुढ कारण असल्याची शक्यता फेटाळून लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.