Shane Warne Greatness: ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नसाठी भारत, श्रीलंकेचे मौन

Shane Warne Death Indian Cricket Team wearing black armbands
Shane Warne Death Indian Cricket Team wearing black armbands ESAKAL
Updated on

मोहाली : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांनी ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्न (Shane Warne) आणि रोडने मार्श (Rodney Marsh) यांना श्रद्धांजली वाहिली. शेन वॉर्न आणि भारतीय क्रिकेट (Indian Cricket) जगताचे जवळचे संबंध होते. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंनी आपल्या दंडाला काळ्या (black armbands) फिती देखील बांधल्या. सहसा ज्या देशातील खेळाडूचे निधन होते त्या देशातील खेळाडू आपल्या दंडावर काळ्या फिती बांधून सामना खेळतात. मात्र भारतीय आणि श्रीलंकन संघानेही ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नला श्रद्धांजली देण्यासाठी आपल्या दंडावर काळ्या फिती बांधल्या. यावरून शेन वॉर्नचा ग्रेटनेस दिसून येतो.

Shane Warne Death Indian Cricket Team wearing black armbands
शेन वॉर्नच्या निधनाचे वृत्त ऐकून पंतप्रधान भांबावले

अवघ्या 52 वर्षाच्या शेन वॉर्नचे निधन झाल्याची बातमी आल्यानंतर क्रिकेट जगताला चांगलाच धक्का बसला. तो एक महान खेळाडू होता. थायलंड येथील एका बेटावरील त्याच्या व्हिलामध्ये तो मृत अवस्थेत आढळून आला होता. आज शेन वॉर्नच्या निधनावर भारत आणि श्रीलंकेने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी शोक व्यक्त केला.

Shane Warne Death Indian Cricket Team wearing black armbands
VIDEO : 90 अंशात वळवलेल्या त्या बॉलनं शेन वॉर्न महान झाला!

बीसीसीआयने याबाबतचे ट्विट शेअर केले. बीसीसीआय आपल्या वक्तव्यात म्हणते 'भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांनी खेळ सुरू होण्यापूर्वी एक मिनिट मौन (A Minute's Silence) पाळून रोडने मार्श आणि शेन वॉर्न यांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय संघ आज काळ्या फिती बांधून खेळणार आहे.'

शेन वॉर्नच्या निधनानंतर जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे. शेन वॉर्नने 145 कसोटी सामन्यात 708 विकेट घेतल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.