मृत्यूपूर्वी शेन वॉर्नने खाल्ले होते Vegemite; मित्राचा खुलासा

Shane Warne Eaten Vegemite Before He Died
Shane Warne Eaten Vegemite Before He Diedesakal
Updated on

मेलबर्न : शेन वॉर्नच्या (Shane Warne) व्हिलामध्ये रक्ताचे डाग आढळून आल्याची माहिती थायलंड पोलिसांनी दिल्यापासून त्याच्या मृत्यूबाबत साशंकता वाढत आहे. दरम्यान, शेन वॉर्नचा मृत्यू (Shane Warne Death) झाला त्यावेळी त्याच्यासोबत व्हिलामध्ये असणाऱ्या त्याच्या मित्राने मृत्यूपूर्वी एक तास शेन वॉर्नने काय काय केले याचा खुलासा केला आहे. (Shane Warne Eaten Vegemite Before He Died)

Shane Warne Eaten Vegemite Before He Died
शेन वॉर्नच्या व्हिलामध्ये थायलंड पोलिसांना आढळून आले रक्ताचे डाग

टॉम हॉल (Tom Hall) हा शेन वॉर्नचा मित्र (Shane Warne) देखील कोह सामुई रिसॉर्टमध्ये शेन वॉर्न सोबत थांबला होता. तो त्याच्या सोबतच थायलंडला गेला होता. हॉल हा स्पोर्टिंग न्यूज वेबसाईटचा सीईओ आहे. त्याने सांगितले की शेन वॉर्नचा मृत्यू होण्यापूर्वी अशी कोणतीही असाधारण गोष्ट घडली नव्हती. त्याचा पहिला प्रश्न होता की आम्हाला थायलंडमध्ये ऑस्ट्रेलिया पाकिस्तान सामना कसा पाहता येईल? आम्ही रूममध्ये सामन्याचा आनंद घेत होतो. दरम्यान, शेन वॉर्न आपल्या क्रिकेटच्या जुन्या आठवणींना उजाळा देत होता.

Shane Warne Eaten Vegemite Before He Died
रोहितची कॅप्टन्सी 'एकदम कडक' तरी गावसकरांनी अर्धा मार्क का कापला?

तो आपीएलच्या पहिल्या हंगामातील रजास्थन रॉयल्सकडून खेळतानाचे किस्से देखील सांगत होता. टॉम हॉल यांनी सांगितले की, 'आमच्या क्रिकेटसंदर्भातील गप्पा रंगत असतानाच आम्ही मित्रांनी काहीतरी खाण्याचे ठरवले. मी शेन वॉर्नबरोबर बऱ्याच चांगल्या ठिकाणी जेवलो आहे. मात्र यावेळी आम्ही थायलंडचे लोकल फूड खाण्यापेक्षा ऑस्ट्रेलियाचा पारंपरिक पदार्थ व्हेजेमाईट टोस्ट (Vegemite Toast) खाण्याचा निर्णय घेतला. यावेळी वॉर्न म्हणाला की व्हेजेमाईट आणि त्यावर थोडा बटर याची तुलनाच नाही. वॉर्न पक्का ऑस्ट्रेलियन होता. वॉर्नने शेवटचा ऑस्ट्रेलियनच पदार्थ खालला.'

Shane Warne Eaten Vegemite Before He Died
Shane Warne: मृत्यूच्या 24 तासांनंतर डॉक्टरांचा मोठा खुलासा

शेन वॉर्नला थायलंडमध्ये ह्रदय विकाराचा त्रास होत असल्याने तो डॉक्टरांकडे गेला होता. याबाबतची काही कल्पना नसल्याचे हॉल यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की वॉर्न डॉक्टरांकडे गेला होता याची कोणतीही कल्पना त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या कोणालाही नव्हती. त्याला माहिती होते की तो थोडा जाड झाला आहे. त्यासाठी तो ट्रेनिंगही करत होता. ज्यावेळी वॉर्न बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. रूग्णवाहिका देखील वेळेत पोहचली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.