नेटकऱ्याच मॅजिक; शार्दुलनं नो बॉल टाकून फ्री हिट देण्यामागचं लॉजिक

Shardul Thakur
Shardul ThakurSakal
Updated on

South Africa vs India, 1st ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना पार्लच्या मैदानात रंगला आहे. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेनं भारतीय संघासमोर 297 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले आहे. आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमासह (Jasprit Bumrah) रस्सी व्हॅन डर दुसेन या दोघांनी शतकी खेळी केली. दुसरीकडे भारताकडून जसप्रित बुमराहने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या तर आर अश्विनला (Ravichandran Ashwin) एकमेव विकेट मिळाली.

या दोन गोलंदाजांशिवाय शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) या गोलंदाजांचा टीम इंडियात समावेश होता. या तिघांना एकही विकेट मिळाली नाही. शार्दुल ठाकूरनं आपल्या 10 षटकांच्या कोट्यात सर्वाधिक 72 धावा खर्च केल्या. यात त्याने तीन नोबॉल आणि 2 व्हाइड बॉलच्या रुपात तीन अवांतर धावा दिल्या. अखेरच्या षटकात त्याने 17 धावा खर्च केल्या. यात नो बॉल टाकून फ्री हीट देत एक षटकारही त्याला खावा लागला.

Shardul Thakur
SA vs IND ... अन् स्टेडियमबाहेर दिमाखात फडकत होता तिरंगा!

यावर सोशल मीडियावर मजेशीर कमेंट्स उमटल्याचे पाहायला मिळाले आहे. शार्दुल ठाकूरनं फ्री हीट देण्यामागे लॉर्ड कारण होतं. असं ट्विट एका नेटकऱ्याने केले आहे. दक्षिण आफ्रिकेनं जास्तीत जास्त धावा करव्या आणि विराट कोहलीला शतकाची संधी निर्माण व्हावी, हा उद्देश शार्दुलच्या डोक्यात असावा, असा तर्क एका नेटकऱ्याने लावला आहे. या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसतात.

Shardul Thakur
ICC Ranking : पंतची मोठी उसळी, विराटची सुधारणा तर रोहितची घसरण

सातत्याने अखेरच्या 12 वनडे सामन्यात शार्दुल ठाकूर महागडा ठरताना दिसतोय. मागील 11 वनडेत त्याने 6 पेक्षा अधिक सरासरीने धावा खर्च केल्या आहेत. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी सामन्यात संधी मिळाल्यावर त्याने सात विकेट घेतल्या होत्या. पण त्यानंतर त्याचा फॉर्म पुन्हा ढासळल्याचे पाहायला मिळाले. वनडेत त्याला पुन्हा अपयश आल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.