Mukesh Kumar Test Debut : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने आपल्या संघात एक बदल केला आहे. संघ व्यवस्थापनाने मुकेश कुमारला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याती संधी दिली आहे.
दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आपल्या संघात एक बदल केला असून रोहितने नाणेफेकीच्यावेळी सांगितले की संघातील अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर हा पूर्णपणे फिट नाहीये. त्यामुळे त्याच्या जागेवर संघ व्यवस्थापनाने मुकेश कुमारला कसोटी पदार्पण करण्याची संधी दिली आहे. (India Vs West Indies 2nd Test)
पश्चिम बंगालकडून खेळणारा मुकेश कुमार हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. तो मुळचा बिहारमधील गोपीगंज येथील आहे. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो पश्चिम बंगालचे प्रतिनिधित्वक करतोय. (Mukesh Kumar Story)
28 वर्षाच्या मुकेशने श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण हे 2015 मध्ये हरियाणाविरूद्ध केले होते. त्याने टी 20 पदार्पण हे गुजरातविरूद्ध 2016 मध्ये केले. मुकेश कुमारने 33 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात 123 विकेट्स घेतल्या आहेत.
मुकेश कुमारला आधी आर्मीमध्ये जायचं होतं मात्र त्यात त्याला यश मिळालं नाही. त्यानंतर तो आपले टॅक्सी चालवणारे वडील काशीनाथ यांना मदत करण्यासाठी 2012 मध्ये कोलकाता येथे गेला. तो तेथे नोकरीच्या शोधात गेलेल्या मुकेश कुमारला क्रिकेटचं वेड लागलं.
त्याने पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या ब स्तरातील क्लब क्रिकेटपासून सुरूवात केली अन् मागे वळून पाहिलेच नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतर मुकेश कुमारला आज भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.