Sheetal Devi Para Archery Championship 2023 : भारताच्या शितल देवीने पॅरा आर्चरी चॅम्पियनशिप 2023 मध्ये इतिहास रचला. शितल ही कांपाऊंड महिला श्रेणीत अंतिम फेरी गाठणारी हात नसलेली पहिली महिला आर्चर ठरली आहे.
16 वर्षाच्या शितलने प्रतिष्ठित स्पर्धेत महिला कंपाऊंड इव्हेंटमध्ये दमदार कामगिरी केली. तिने या स्पर्धेची फायनल गाठली असून तिने सेमी फायनलमध्ये भारताच्याच सरिताला पराभूत केले. आता ती फायनलमध्ये इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. सेमी फायनलमध्ये तिने 137 - 133 अशा गुणांनी विजय मिळवला.
जगातील एकमेव आर्मलेस तीरंदाज शितल देवी ही पुढच्यावर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या पॅरालंपिकमध्ये स्थान मिळवण्याच्या इराद्याने जागतिक आर्चरी पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळत आहे. जम्मू काश्मीरच्या लोही धार गावात राहणाऱ्या 16 वर्षाची शितल देवीने जम्मू येथील माता वैष्णवदेवी तीरंदाजी अकॅडमीत प्रशिक्षण घेतले आहेत.
शितलने काही दिवसांपासपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, एक शिक्षक होऊन सामन्य जीवन जगण्याचा तिचा विचार होता. मात्र बंगळुरू येथील बीईंग यू नावाच्या एक एनजीओ चालवणाऱ्या प्रिती राय यांच्याशी भेट झाल्यानंतर तिचे आयुष्य बदलून गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.