IND vs WI : धवन-अय्यरची कोरोनावर मात; ऋतुराज अजूनही क्वारंटाईन

Shreyas Iyer And Shikhar Dhawan
Shreyas Iyer And Shikhar Dhawan Sakal
Updated on

IND vs WI, ODI Series: भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि मध्य फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कोरोनातून सावरले आहेत. कोविड-19 रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर या दोघांना प्रॅक्टिससाठी मंजूरी मिळाली आहे. दोघांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी दुसऱ्या वनडे सामन्यासाठी सिलेक्शनसाठी प्रक्रियेत त्यांना भाग घेता येणार नाही. (Shikhar Dhawan And Shreyas Iyer Training After Testing Negative For Covid 19)

अय्यर आणि धवनने बीसीसीआयच्या मेडिकल टीम निरिक्षणाखाली नरेंद्र मोदी स्टेडियमवर सरवाही केला. दुसरीकडे युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड अजूनही क्वांरटाईनमध्येच आहे. वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वीत शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋतूराज गायकवाड आणि नवदीप सैनी यांच्यासह तीन स्टाफ सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते.

Shreyas Iyer And Shikhar Dhawan
IPL Auction : धोनीसाठी कायपण! सचिनमुळे CSK समोर हरली होती MI

या स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीली टीम इंडियाने वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेत दमदार सुरुवात केली होती. पहिल्या वनडेत टीम इंडियाने 6 विकेट्सनं विजय नोंदवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने टीम इंडिया बुधवारी मैदानात उतरले.

Shreyas Iyer And Shikhar Dhawan
IND vs WI : "विराट कोहलीनं ब्रेक घ्यावा"

पहिल्या वनडेत कशी राहिली टीम इंडियाची कामगिरी

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघातील फिरकीपटूंनी विशेष कामगिरी बजावली. युजवेंद्र चहलने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. फिरकीपटू वाशिंग्टन सुंदरला तीन विकेट्स मिळाल्या. या दोघांच्या फिरकीसमोर वेस्ट इंडीजची फलंदाजी अक्षरश: कोलमडली. वेस्ट इंडीजचा डाव अवघ्या 176 धावांत आटोपला होता. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने अर्धशतक झळकावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.