VIDEO: 'ये शर्ट हमको दे दे गब्बर' चालू मॅचमध्ये फॅनने धवनला मागितला शर्ट

शिखर धवन आणि केएल राहुल ही जोडी सलामीला आली तेव्हा धवनची जर्सी पाहून चाहते थोडे आश्चर्यचकित झाले
shikhar dhawan
shikhar dhawan
Updated on

Shikhar Dhawan Zim vs Ind : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा आणि अंतिम वनडे सामना आज हरारे येथे होत आहे. भारताने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाला तिसरा सामना जिंकून क्लीन स्वीप करायचा आहे. या सामन्यात कर्णधार राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताने झिम्बाब्वेसमोर 290 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

shikhar dhawan
ZIM vs IND 3rd ODI : सिकंदर रझाचे झुंजार शतक, भारताचा शेवटच्या षटकात विजय

टीम इंडियाने या मालिकेत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ होती. यानंतर शिखर धवन आणि केएल राहुल ही जोडी सलामी देण्यासाठी आली तेव्हा धवनची जर्सी पाहून चाहते थोडे आश्चर्यचकित झाले. धवनच्या शर्टवर खेळाडूचे नाव नाही तर टेप लावण्यात आला होता. शार्दुल ठाकूरची ती जर्सी होती जी धवनने मैदानावर घातली होती. धवनने त्याची जर्सी का घातली नाही, हे माहीत नाही, पण शिखर धवनच्या जर्सीबद्दल एक चाहता खूप उत्सुक होता. या चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो स्टँडमध्ये 'शिखर मी तुझा शर्ट घेऊ शकतो का?, असे फलक घेऊन उभे आहे.

केएल राहुल आणि शिखर धवनने भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही खेळाडूंची अर्धशतकी भागीदारी 79 चेंडूत पूर्ण झाली. भारताला पहिला धक्का केएल राहुलच्या रूपाने 63 धावांवर बसला. भारतीय कर्णधार 46 चेंडूत 30 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताला दुसरा धक्का उपकर्णधार शिखर धवनच्या रूपाने बसला, तो 68 चेंडूत 40 धावा करून झेलबाद झाला. शुभमन गिल आणि इशान किशन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 140 धावांची शतकी भागीदारी केली. शुभमन गिलने 82 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने वनडेतील पहिले शतक पूर्ण केले. भारताने पूर्ण 50 षटके खेळून 8 गड्यांच्या मोबदल्यात 289 धावा केल्या. शुभमन गिलने 130 धावांची शतकी खेळी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()