Shikhar Dhawan indian cricket player: भारतीय क्रिकेट संघातील डावखुरा फलंदाज शिखर धवन हा जसा त्याच्या आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जातो तसा तो मैदानाबाहेरही चर्चेत असतो. आता शिखरच्या एका विधानाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला वेगवेगळे प्रश्नही विचारले आहेत.
शिखरच्या बोलण्याचा रोख हा नेमका कुणाकडे आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांकडून सातत्यानं विचारला जातोय. २०२१ मध्ये पहिल्यांदा शिखर धवनला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होण्याची संधी मिळाली होती. मात्र त्यात त्यानं फारशी चमकदार कामगिरी केली नाही. आता भारतानं टी २० साठी कॅप्टन म्हणून अष्टपैलु हार्दिक पंड्याची निवड केली आहे. यापूर्वी देखील शिखर धवनच्या नावाची चर्चा होती. त्याच्या दुखापतीमुळे तो संघात असणार की नाही याविषयी शंका उपस्थित केली जात होती.
हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
आता धवन हा पुन्हा फॉर्मात आला आहे. एकदिवसीय सामन्यासाठी तयार आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारतानं टी २० चा एक सामना जिंकला आहे. दुसरीकडे आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा ओपनर असणाऱ्या मयांक अग्रवालच्या जागी देखील धवनची वर्णी लागली आहे. यावेळी त्याच्याकडे त्या संघाची कॅप्टन्सीदेखील आली आहे. याविषयी त्यानं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
धवन म्हणाला, कॅप्टन्सी ही काय येते आणि जाते, आपण सगळेजण रिकाम्या हातानं येतो आणि रिकाम्या हातानं जातो...तेव्हा त्या गोष्टींचा फारसा विचार करण्याची गरज नाही. त्यामुळे जे काही होते त्याविषयी अजिबात भीती वाटत नाही. आपल्या परफॉर्मन्सवर जास्त फोकस करणे गरजेचे आहे. त्याच्यावर मी आता लक्ष केंद्रीत करायचे ठरवले आहे. असेही धवननं म्हटले आहे. धवनची प्रतिक्रिया ही आता चर्चेत आली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.