WI vs IND Shikhar Dhawan : टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत इंग्लंडला पराभूत केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने आता वेस्ट इंडिज दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. टीम इंडियाला यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शिखर धवन आणि कंपनीसाठी विंडीज दौऱ्यासाठी चार्टर्ड फ्लाइटची व्यवस्था केली आहे.
धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मंगळवारी एकदिवसीय मालिकेसाठी रवाना होणार आहे. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला वनडे मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. भारताने एकदिवसीय मालिकेसाठी 16 जणांचा संघ निवड करण्यात आली आहे. या संघात संजू सॅमसन, सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांचा समावेश असेल. हे तिन्ही खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग नव्हते.
खराब फॉर्मशी झुंजत असलेला विराट कोहली विंडीज दौऱ्याचा भाग नसणार आहे. कोहली आता आशिया कप दरम्यान भारतीय संघात सामील होणार असून आशिया कप 27 ऑगस्टपासून होणार आहे. सध्याच्या इंग्लंड दौऱ्यावर कोहलीला पाच डावांत 20 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावून जवळपास तीन वर्षे झाली आहेत.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:
शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रशांत कृष्णा , मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.