Team India : शिखर धवनला पुन्हा बनवणार टीम इंडियाचा कर्णधार, मोठी अपडेट आली समोर

Shikhar Dhawan Asian Games 2023
Shikhar Dhawan Asian Games 2023
Updated on

Shikhar Dhawan Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 चीनमध्ये 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान खेळली जाणार आहेत. या खेळांमध्ये क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशियाई खेळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय आपले पुरुष आणि महिला दोन्ही संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत पाठवणार आहे. क्रिकेट स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये आयोजित केली जाते.

Shikhar Dhawan Asian Games 2023
Team India: कसोटीनंतर आता 'या' दिग्गज खेळाडूची ODI कारकीर्दही संपली! निवडकर्त्यांच्या अ‍ॅक्शनने खळबळ

आशियाई क्रीडा स्पर्धा होत असतानाच एकदिवसीय विश्वचषकही भारतात खेळल्या जाणार आहे. अशा स्थितीत पुरुष ब संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठवला जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय शिखर धवनला या संघाचा कर्णधार बनवू शकते. शिखर धवन टीम इंडियातून बाहेर पडला असला तरी तो आशियाई क्रीडा स्पर्धेत पुनरागमन करू शकतो. 30 जूनपूर्वी BCCI भारतीय ऑलिम्पिक संघटनेला खेळाडूंची यादी पाठवेल ज्यांना ते आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी पाठवू शकतात.

Shikhar Dhawan Asian Games 2023
Wrestlers Protest: पहिलवान आंदोलन करणार नाहीत हे कळल्यावर बृजभूषण सिंह हसले? पहा व्हायरल व्हिडिओ

शिखर धवनने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये त्याने 7 शतके आणि 5 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 2315 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यांमध्ये 17 शतके ठोकली आणि एकूण 6793 धावा जोडल्या. शिखर धवनने यापूर्वी 'बी' संघाचे नेतृत्व केले आहे. अशा परिस्थितीत आता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण जिंकून देण्याची जबाबदारी शिखर धवनवर येऊ शकते.

Shikhar Dhawan Asian Games 2023
Team India : टीम इंडियातुन वगळल्यानंतर अर्शदीपचे तांडव, इंग्लंडमध्ये काढला राग; BCCI ला दिले चोखउत्तर

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल. 2010 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता आणि 2014 च्या आवृत्तीचाही भाग होता. मात्र भारताने या स्पर्धेत आपले दोन्ही संघ पाठवले नाहीत. 2018 मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला नव्हता.

यावेळी देखील भारतीय क्रिकेट बोर्डाने याआधी सांगितले होते की व्यस्त वेळापत्रकामुळे पुरुष आणि महिला क्रिकेट संघ या मेगा स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. पण बीसीसीआयने आता आपला निर्णय बदलला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.