Shikhar Dhawan ला 3 वर्षांपासून शतकाची प्रतीक्षा, 3 धावांनी हुकली

भारतीय फलंदाजांमध्ये फक्त सचिन तेंडुलकर एकदिवसीय क्रिकेटमध्ये धवनपेक्षा जास्त नर्व्हस नाइंटीचा बळी ठरला आहे.
shikhar dhawan
shikhar dhawansakal
Updated on

IND vs WI 1st ODI: टीम इंडियाचा कर्णधार सलामीवीर शिखर धवनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात अप्रतिम खेळी खेळली. शिखर धवन शतक झळकावण्यापासून अवघ्या तीन धावांनी हुकला. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेल्या या सामन्यात त्याने 99 चेंडूत 97 धावा केल्या. ज्यात 10 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. धवनला फिरकी गोलंदाज गुडाकेश मोतीने ब्रूक्सच्या हाती झेलबाद केले.

shikhar dhawan
Shubman Gill च्या रन आऊटनंतर सोशल मीडियावर चाहत्यांचा तांडव; पाहा प्रतिक्रिया

शिखर धवनने जवळपास तीन वर्षांपासून एकदिवसीय सामन्यात शतक झळकावलेले नाही. 2019 च्या विश्वचषकात धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे शतक केले होते. त्यानंतर धवन तीन वेळा नर्व्हस नाइंटीचा बळी ठरला आहे. आता 97 धावांच्या खेळी यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या राजकोट एकदिवसीय सामन्यात 2020 साली 96 वर बाद झाला, त्यानंतर पुण्यात इंग्लंडविरुद्ध 98 धावांवर बाद झाला होता.

भारतीय फलंदाजांमध्ये फक्त सचिन तेंडुलकर एकदिवसीय क्रिकेटमध्ये धवनपेक्षा जास्त नर्व्हस नाइंटीचा बळी ठरला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एकूण 17 वेळा नर्व्हस नाइंटीचा बळी ठरला.

shikhar dhawan
Pro Kabaddi लीगच्या नवव्या मोसमाचा दम लवकरच घुमणार

शिखर धवनने 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. धवनने आतापर्यंत 34 कसोटी, 153 एकदिवसीय आणि 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धवनच्या नावावर 45.54 च्या सरासरीने 6422 धावा आहेत ज्यात 17 शतके आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी सामन्यांमध्ये धवनच्या नावावर 40.61 च्या सरासरीने 2315 धावा आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये धवनने 7 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय धवनच्या बॅटमधून एकूण 1759 धावा झाल्या आहेत.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना कॅरेबियन संघासमोर 309 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ निर्धारित 50 षटकांत 6 गडी गमावून 305 धावाच करू शकला. या सामन्यात 97 धावांची खेळी करणारा भारतीय कर्णधार शिखर धवनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.