Shikhar Dhawan Team India Celebration : भारताने दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्या वनडे सामन्यात 7 फलंदाज राखून पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने मालिका 2 - 1 अशी खिशात घातली. कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारताची दुसरी फळी या मालिकेत खेळली होती. शिखर धवनने गेल्या अनेक मालिकेत भारताच्या युवा संघाचे यशस्वी नेतृत्व करत भारताला विजयीपथावर नेले. दरम्यान, मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी नाचून जल्लोष साजरा केला. याचा व्हिडिओ शिखर धवनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. त्याला त्याने 'जिंकून बोलो तारा रा रा..' असे कॅप्शनही दिले आहे.
शिखर धवनने शेअर केलेल्या व्हिडिओत टीम इंडियातील टीम इंडियातील सर्व खेळाडू पॅव्हेलियनमध्ये डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओत देखील शिखर धवन संघाचे नेतृत्व करताना दिसतोय. त्याच्या भोवतीच टीम इंडिया प्रसिद्ध पंजाबी गाणं 'बोलो तारा रा रा' वर ठेका धरताना दिसते आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला शिखर धवनने
भारताने दक्षिण आफ्रिकेचे 100 धावांचे माफक आव्हान 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 19.1 षटकात पार केले. भारताकडून शुभमन गिलने 49 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने नाबाद 28 धावा करत भारताचा विजय षटकार मारून साकार केला. भारताने या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाचा एका कॅलेंडर वर्षातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
कुलदीप यादवने 4 षटकात 4 विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. आफ्रिकेकडून क्लासेनने सर्वाधिक 34 धावा केल्या. सामन्याचा मानकरी म्हणून कुलदीप यादवला पुरस्कार मिळाला तर मालिकावीर म्हणून मोहम्मद सिराजची निवड करण्यात आली. या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा करत आफ्रिकेच्या कसलेल्या फलंदाजीला जेरीस आणले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.