VIDEO : 'हे फक्त शिखरच करू शकतो' 'जंटलमन' द्रविड दिसला इन्स्टा रीलमध्ये

VIDEO : 'हे फक्त शिखरच करू शकतो' 'जंटलमन' द्रविड दिसला इन्स्टा रीलमध्ये
Updated on

Rahul Dravid : भारतीय संघ वेस्ट इंडीजमध्ये कसोटी आणि टी 20 मालिका खेळण्यासाठी दाखल झाला आहे. भारत पहिला वनडे सामना 22 जुलैला खेळणार आहे. या दौऱ्यावर भारत तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळेल. दरम्यान, संघ वेस्ट इंडीजमध्ये दाखल झाल्यावर संघाचा कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) एक इन्स्टा रील (Instagram Reels) केला. यात भारतीय संघातील काही खेळाडूंबरोबरच संघाचा प्रशिक्षक आणि जंटलमन म्हणून ओळख असलेल्या राहुल द्रविडनेही (Rahul Dravid) आपली उपस्थिती दर्शवली. राहुल द्रविडचा हा बहुदा पहिलाच रील असल्याने द्रविडचा इन्स्टा रील डेब्यू करवण्यात शिखर धवनचा मोठा वाटा आहे.

VIDEO : 'हे फक्त शिखरच करू शकतो' 'जंटलमन' द्रविड दिसला इन्स्टा रीलमध्ये
Video: पाकिस्तानी बाबर आझमच्या पाठीमागून हल्ला, ज्याने बघितला तो झाला थक्क!

शिखर धवनने इन्स्टाग्रामवर सुरू असलेल्या #HeyTrend या ट्रेंडचा वापर करत टीम इंडियाचे काही खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना सोबत घेऊन इन्स्टाग्राम रील तयार केला. या रीलवर भारताचा अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिक प्रतिक्रिया देताना म्हणाला की, 'हा स्टंट फक्त शिखर धवनच करू शकतो.' तर अभिनेता रणवीर सिंहने 'हाहाहा एक नंबर' अशी प्रतिक्रिया दिली.

VIDEO : 'हे फक्त शिखरच करू शकतो' 'जंटलमन' द्रविड दिसला इन्स्टा रीलमध्ये
Video: शेवटचा वन-डे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरताच Ben Stokes ला अश्रू अनावर

शिखर धवन सध्या भारतीय वनडे संघाचा सदस्य आहे. मात्र त्याला कसोटी आणि टी 20 संघात स्थान मिळालेलं नाही. तो इंग्लंड विरूद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत खेळला होता. भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली. मात्र शिखर धवनची या मालिकेत कामगिरी फारशी उत्साहवर्धक नाही. त्याने पहिल्या सामन्यात नाबाद 31, दुसऱ्या सामन्यात 9 तर तिसऱ्या सामन्यात 1 धाव केली होती. आता वेस्ट इंडीज दौऱ्यावर शिखर धवनकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.