VIDEO : बायकोचा फोन आला, ती रडत होती अन् माफी मागत म्हणाली... शिखर धवनचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

Shikhar Dhawan Shares New Video On Wife On Instagram
Shikhar Dhawan Shares New Video On Wife On Instagramsakal
Updated on

Shikhar Dhawan Shares New Video On Wife On Instagram : टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज शिखर धवन बऱ्याच दिवसांपासून किक्रेट अ‍ॅक्शनपासून लांब आहे. तो शेवटचा आयपीएल 2023 मध्ये खेळताना दिसला होता, ज्यामध्ये त्याने पंजाब किंग्जचे नेतृत्व केले होते. त्याचबरोबर गब्बरने या वर्षात आतापर्यंत भारतीय संघासाठी एकही सामना खेळलेला नाही.

शिखर धवन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने नुकतीच पत्नी आयेशा मुखर्जीची घटस्फोटाची याचिका मंजूर केली आहे. कोर्टाने शिखर धवनला त्याच्या ऑस्ट्रेलियन पत्नीपासून मानसिक क्रौर्याच्या आधारावर वेगळे होण्याची परवानगी दिली. या सगळ्यामध्ये धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धवनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो त्याच्या स्टाईलमध्ये एका डायलॉगवर लिप सिंक करताना दिसत आहे. धवन व्हिडिओमध्ये म्हणतो की, 'माझ्या पत्नीने कॉल केला होता. रडत होती आणि माफी मागत. ती म्हणली मला माफ कर बाबू. तू सांगशील तसं मी करीन. तुझ्या इच्छेप्रमाणे मी राहीन. तिचे बोलणे ऐकून मलाही आनंद झाला. ती कोणाची बायको होती हे मला माहीत नाही. पण ती खूप चांगली होती. अशी पत्नी सर्वांना देवो.

2012 मध्ये धवन आणि आयेशाचे लग्न झाले होते. दोघांनाही एक मुलगा असून त्याचे नाव जोरावर आहे. पत्नीने शिखरला त्याच्या एकुलत्या एक मुलापासून वर्षानुवर्षे वेगळे राहण्यास भाग पाडून मानसिक त्रास दिल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

कोर्टाने 37 वर्षीय धवनला त्याच्या मुलाला भेटण्याचा आणि त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलण्याचा अधिकार दिला आहे. 17 ऑक्टोबरला धवनने आपल्या मुलासोबत झालेल्या व्हिडिओ कॉल संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला होता.

धवन गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय क्रिकेटमधून बाहेर आहे. डिसेंबर 2022 मध्ये त्याने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.