Shivam Dube : CSK इम्पॅक्ट! 'खेळ कसा संपवायचा हे धोनीने...' दोन सामन्यांमध्ये धमाका केल्यानंतर दुबेचा मोठा खुलासा

Shivam Dube credits CSK and MS Dhoni News :
Shivam Dube credits CSK and MS Dhoni News
Shivam Dube credits CSK and MS Dhoni Newssakal
Updated on

India Vs Afghanistan 2nd T20 Series : भारतीय क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव करत मालिका जिंकली आहे. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही अष्टपैलू शिवम दुबेने फलंदाजी आणि चेंडूने चमकदार कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

अष्टपैलू शिवम दुबेने अफगाणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या दोन टी-20 सामन्यांमध्ये बॅटने सनसनाटी कामगिरी केली आहे. मोहालीमध्ये त्याने 40 चेंडूत 60* तर इंदूरमध्ये, दुबेने 32 चेंडूत 63* धावा केला, आणि टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात टीम इंडियात दावेदारी ठोकली.

Shivam Dube credits CSK and MS Dhoni News
Ind vs Afg : विराट कोहलीची सुरक्षा 'राम भरोसे', पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह? इंदूरच्या स्टेडियममध्ये चाहत्याची घुसखोरी

शिवम दुबे या मालिकेत ज्या प्रकारे आपल्या फटकेबाजीने चाहत्यांची आणि तज्ञांची मने जिंकली आहेत, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की हा खेळाडू टी-20 संघात दीर्घकाळ टिकणार आहे. सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर मुंबईत जन्मलेल्या या खेळाडूने आपल्या यशाचे श्रेय आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्ज आणि कर्णधार एमएस धोनीला दिले आहे.

Shivam Dube credits CSK and MS Dhoni News
सात्विक-चिराग जोडीला उपविजेतेपद ; भारतीय जोडीला मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवता आली नाही.

सामना संपल्यानंतर दुबे म्हणाला की, “हे श्रेय CSK ​​संघ आणि माही भाई यांना जाते. माझ्याकडे हे सर्व आधी पण होते पण CSK ने मला आत्मविश्वास दिला. त्याने मला सांगितले की, तु आयपीएलमध्ये धावा करू शकतो. हसी आणि फ्लेमिंग सारख्या दिग्गज खेळाडूंनी माझ्यावर विश्वास होता की मी त्यांना पाहिजे ते करू शकतो.

पुढे बोलताना दुबे म्हणाला, “जेव्हा मी CSK सोबत होतो तेव्हा MS धोनीने मला सांगितले की माझ्यात चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे. पण त्याने मला काही गोष्टीवर काळजी घेण्यास सांगितले. म्हणून, मी काही गोष्टीवर लक्ष केंद्रित केले.

आगामी टी-20 वर्ल्ड कप संघात वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडूच्या स्थानासाठी दुबेची थेट स्पर्धा हार्दिक पांड्याशी आहे. अशा परिस्थितीत इंडियन प्रीमियर लीगची आगामी आवृत्ती खूप महत्त्वाची ठरणार आहे, कारण दुबेला तिथेही आपला फॉर्म कायम ठेवण्यात यश आले तर तो टी-20 वर्ल्ड कप खेळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.