पाकविरूद्ध 'अशीच' संघनिवड करू नका, अख्तरचा भारताला सल्ला

Shoaib Akhtar Give Advice To India For India Pakistan T20 World Cup 2022 Match
Shoaib Akhtar Give Advice To India For India Pakistan T20 World Cup 2022 Matchesakal
Updated on

रावळपिंडी : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) आगामी टी 20 वर्ल्डकप (T20 World Cup 2022) सुरू होण्यापूर्वीच भारताला संघ निवडताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबरला एकमेकांशी भिडणार आहेत. हा हाय व्होल्टेज सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रविवारी होणार आहे.

गेल्या ची 20 वर्ल्डकपमध्ये बबार आझमच्या पाकिस्तानी संघांने भारताचा इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये पराभव केला होता. पाकिस्तानने भारताला 10 विकेट्स राखून मात दिली होती. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झाला होता. यावेळी मोहम्मद रिझवान, शाहीन आफ्रिदी आणि कर्णधार बाबर आझमने दमदार कामगिरी केली होती.

Shoaib Akhtar Give Advice To India For India Pakistan T20 World Cup 2022 Match
बंगाल सोडण्याबाबत साहा बोलला; 'त्या' व्यक्तीच्या वक्तव्यामुळे....

दरम्यान, शोएब अख्तर स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, 'पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारत अशीच रँडम संघनिवड (Team Selection) करू शकत नाही. मला असे वाटते की संघ व्यवस्थापनाने संघ निवडताना खूप काळजी घेणे गरजेते आहे. मला विश्वास आहे की भारत तगडा संघ निवडेल. यंदाच्यावेळी पाकिस्तानसाठी देखील सामना सोपा असणार नाही.'

अख्तर पुढे म्हणाला की, 'जर भारताने स्पर्धेसाठी योग्य संघ निवडला तर ते पाकिस्तानला हरवण्याची जास्त शक्यता आहे. भारताचा संघ सध्या समतोल वाटतोय. त्यामुळे भारत - पाकिस्तान सामन्यातचा निकाल काय असेल हे आताच सांगणे खूप कठिण आहे.'

Shoaib Akhtar Give Advice To India For India Pakistan T20 World Cup 2022 Match
नाईटक्लब बाहेर फुटबॉलरवर हल्ला, पोलिसांनी गोळीबार करून वाचवले प्राण

शोएब अख्तरने पाकिस्तानला देखील सल्ला दिला की, त्यांनी या सामन्यात प्रथम फलंदाजी करून भारतासमोर मोठी धावसंख्या उभारावी. अख्तरने हे देखील मान्य केले की, मेलबर्नवर पाकिस्तानपेक्षा भारताचेच चाहते जास्त असणार आहेत. अख्तर म्हणाला, 'एमसीजीचे खेळपट्टी खूप चांगली आहे. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे पाकिस्तानच्या फायद्याचे आहे. मेलबर्नवर 1 लाख प्रेक्षक असतील. त्यातील 70 हजार तरी भारताचेच समर्थक असणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानवर दबाव असणार हे नक्की.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.