महेंद्रसिंग धोनी एक नाव नव्हे, युगच - शोएब अख्तर 

sakal (1).jpg
sakal (1).jpg
Updated on

क्रिकेट जगतात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या दोन्ही संघातील खेळाडू देखील मैदानावर उतरताना त्यांच्यातील आक्रमकता नेहमीच पाहायला मिळते. त्यातच पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज आणि भारतीय संघाचे फलंदाज यांच्यातील द्वंद्व पाहणे हे कित्येक क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) स्पर्धा सोडल्यास समोरासमोर मैदानावर उतरलेल्या नाहीत. पण या दोन्ही संघातील खेळाडू सोशल मीडियावर एकमेकांबद्दल बोलताना दिसतात. त्यातल्या त्यात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर टीम इंडिया आणि भारतीय संघातील क्रिकेटपटूंबद्दल आपले मत नेहमीच मांडत असतो. 

पाकिस्तान संघातील रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि भारतीय संघातील फलंदाज यांच्यातील मैदानावरील संघर्ष हा कायम लक्षात राहण्यासारखाच होता. मात्र त्यानंतर शोएब अख्तरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती स्वीकारल्यावर मैदानाची जागा आता सोशल मीडियाने घेतल्याचे दिसते. त्यामुळे नेहमीच तो भारतीय संघाविषयी काहीनाकाही बोलत असतो. नुकतेच ट्विटरवर शोएब अख्तरने #AskShoaibAkhtar दरम्यान चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळेस त्याने भारतीय संघातील अनेक खेळाडूंविषयी आपले मत सांगितले. 

पाकिस्तान मधील एका क्रिकेट चाहत्याने ट्विटरवर शोएब अख्तरला भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी बद्दल विचारले. यावर शोएब अख्तरने दिलेल्या उत्तराने सर्व क्रिकेट चाहत्यांची मने जिकली. पाकिस्तान मधील या चाहत्याने अख्तरला धोनीबद्दल तुझे काय मत आहे, असे विचारले. त्यावर शोएब अख्तरने 'धोनी म्हणजे संपूर्ण एका युगाचे नाव आहे,' असे उत्तर दिले. शोएब अख्तरने आपल्या या उत्तराने जगभरातील क्रिकेट चाहत्यांपासून महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांची देखील मने जिंकली.      

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आयसीसीने दशकातील कसोटी, आतंरराष्ट्रीय आणि टी-ट्वेन्टी संघाची घोषणा केली होती. आणि यातील आतंरराष्ट्रीय व टी-ट्वेन्टी संघाचे नेतृत्व आयसीसीने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीकडे सोपविले होते. याशिवाय दशकातील आयसीसीचा स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार आयसीसीने महेंद्रसिंग धोनीला जाहीर केला होता.  2011 मध्ये इंग्लंड येथे झालेल्या नॉटिंगहॅम कसोटी सामन्यादरम्यान इंग्लंडचा फलंदाज इयान बेलला चुकीच्या पद्धतीने धावबाद दिल्यानंतर, भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने खेळ भावनांचा आदर राखत इयान बेलला पुन्हा मैदानात खेळण्यासाठी बोलावले होते.  महेंद्रसिंग धोनीच्या या कृतीमुळे क्रिकेटच्या चाहत्यांनी महेंद्रसिंग धोनीला या पुरस्कारासाठी निवडले असल्याचे आयसीसीने म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.