Shoaib Akhtar Virat Kohli Retire : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनंतर आता माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही टीम इंडियाचा स्टार विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. यापूर्वी शाहिद आफ्रिदीने कोहलीला कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना निवृत्ती घ्यायला हवी असा सल्ला दिला होता. यानंतर यूजर्सनी त्याला जोरदार ट्रोल केले होते. यानंतर आता 'रावळपिंडी एक्सप्रेस' शोएब अख्तरने कोहलीच्या निवृत्ती बाबत बोला आहे. अख्तर म्हणाला की, जर कोहलीला एकदिवसीय आणि कसोटी यांसारख्या फॉरमॅटमध्ये आपली कारकीर्द लांबवायची असेल तर त्याने टी-20 मधून निवृत्ती घ्यावी.
शोएब अख्तर म्हणाला, कोहली टी-20 वर्ल्ड कपनंतर टी-20 फॉरमॅटमधून निवृत्त होऊ शकतो. इतर फॉरमॅटमधील कारकीर्द लांबवण्यासाठी तो हे करू शकतो. जर मी त्याच्या जागी असतो तर मीही तेच केले असते. शोएब अख्तरआधी शाहिद आफ्रिदीनेही विराट कोहलीला निवृत्तीचा सल्ला दिला होता. त्याने शानदार कारकिर्दीबद्दल कोहलीचे कौतुक केले होते. आफ्रिदी म्हणाला की, मला असे वाटते की विराट कोहलीला ज्यावेळी निवृत्ती घ्यायची असेल त्यावेळी तो चांगल्या प्रकारे निवृत्ती घेईल. ज्या प्रकारे त्याने आपल्या कारकिर्दिची सुरूवात केली होती. त्याचप्रकारे तो आपल्या कारकिर्दिची सांगता देखील करेल.'
विराट कोहली अलीकडेच खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा एकमेव क्रिकेटर बनला आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 102 कसोटी, 104 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 262 एकदिवसीय सामने खेळले आहेत. विराटने सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 51.94 च्या सरासरीने 3584 धावा केल्या आहेत. कोहलीने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 71 वे शतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावरही 71 शतके आहेत. या बाबतीत सचिन तेंडुलकर 100 शतकांसह अव्वल स्थानावर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.