Shoaib Akhtar : मुंबईत पाकिस्तानचं राष्ट्रगीत वाजतंय अन्... शोएब अख्तर हे कसलं स्वप्न पाहतोय?

Shoaib Akhtar ODI World Cup 2023
Shoaib Akhtar ODI World Cup 2023 esakal
Updated on

Shoaib Akhtar ODI World Cup 2023 : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर कधी काय बोलेल याचा नेम नाही. तो आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत असतो. अशी वादग्रस्त वक्तव्ये करण्यासाठीच बहुदा त्याने आपला यूट्यूब चॅनल काढला आहे. यावरून तो आपल्या देशातील खेळाडूंना देखील सोडत नाही.

शोएब अख्तरचे असेच एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. शोएब अख्तरने यावेळी भारतात 2011 ला झालेल्या वनडे वर्ल्डकपमधील एक किस्सा सांगितला. भारताने त्याच्या स्वप्नाचा कसा चुराडा केला हे तो सांगत होता.

Shoaib Akhtar ODI World Cup 2023
Ahmedabad Cricket Stadium : अहमदाबादमध्ये दोन खेळपट्ट्या तयार

भारतात 2011 चा वनडे वर्ल्डकप खेळला गेला होता. हा वर्ल्डकप भारताबरोबरच श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये देखील आयोजित केला गेला होता. या वर्ल्डकपमध्ये भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत वर्ल्डकप आपल्या नावावर केला. तर भारताने उपांत्य फेरीत पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती. याची सल अख्तरच्या मनात कामय राहिली आहे.

अख्तर म्हणाला की, 'भारताने 2011 च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता. मोहालीत झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारताने केलेला पराभव अख्तरच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी आठ मिहन्यांनी मिळणार आहे.'

'मला असे वाटते की भारतात सुरू वनडे वर्ल्डकप सुरू आहे...पाकिस्तान संघ भारताला चोपतोय.. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजतंय... आम्ही भारताला हरवून वर्ल्डकप जिंकून चाललो आहे. भारताचा आभारी आहे आम्ही आमचा वर्ल्डकप घेऊन चाललो आहे. कसेही करून जिंकू, फक्त पाकिस्तानने वर्ल्डकप जिंकायला हवा.'

Shoaib Akhtar ODI World Cup 2023
IND vs AUS 4th Test: मला सतत चर्चा करणे आवडत नाही... द्रविड खेळपट्टीबद्दल स्पष्टच बोलला

भारताने 2011 मध्ये पाकिस्तानचा 30 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात अख्तर खेळू शकला नव्हता. यानंतर अख्तरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. विशेष म्हणजे अख्तर भारतात येऊन वर्ल्डकप जिंकण्याचे दिवास्वप्न पाहतोय मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हे भारतातील वर्ल्डकपवर बहिष्कार घालण्याची भाषा करत आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()