नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) हा क्रिकेटमधील किस्से (Cricket Stories) सांगण्यात तरबेज आहे. तो आपल्या यूट्यूब चॅनेवर क्रिकेट विश्लेषण आणि किस्से सातत्याने सांगत असतो. त्याची ही यूट्यूब वाणी कायम चर्चेत असते. आता शोएब अख्तरने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सोबत लखनौमध्ये घडलेला किस्सा शेअर केला आहे. सध्या हा किस्सा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
स्टँड अप कॉमेडियन (Stand Up Comedian) तन्मय भट आणि जाकीर खान यांच्याबरोबर वेगावान गोलंदाज शोएब अख्तरने यूट्यूब चॅट केले होते. यावेळी शोएब अख्तरने हे चर्चेत आलेले वक्तव्य केले होते. शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरसोबत लखनौमध्ये घडलेला हा किस्सा शेअर केला.
शोएब अख्तरने यूट्यूब चॅटदरम्यान सांगितले की, 'माझ्या जवळ सांगण्यासाठी बरेच किस्से आहेत. हा किस्सा लखनौमधील आहे. लखनौमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक सामना रंगाला होता. सामन्यानंतर रात्री एक पार्टी झाली होती. त्यात भारत आणि पाकिस्तान संघातील खेळाडू देखील होते. मी सचिनच्या जवळ गेलो आणि त्याला म्हणालो की चल मी तुला माझ्या खांद्यावर बसवतो. मी त्याला खांद्यावर बसवण्यासाठी त्याला उचलू लागलो. मला वाटले की तो उंचीने कमी आहे तर मी त्याला सहज उचलेन. मात्र जेव्हा मी त्याला उचलले त्यावेळी तो घसरून पडला. मला वाटले की सचिनला आता दुखापत होणार. मी त्याची माफी मागितली. त्याला विचारले सचिन आर यू ओके?'
यावेळी सचिनने प्रत्युत्तर दिले. जर माला काही झालं असतं तर भारतीय लोकांनी तुला जिवंत जाळलं (Burnd Alive) असतं. शोएब हा किस्सा सांगितल्यानंतर हसू लागला. यानंतर शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरला ऑल टाईम ग्रेट खेळाडू संबोधले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.