India Vs England 2nd Test : इंग्लडंकडून खेळणाऱ्या पाकिस्तानी वंशाच्या बशीरचे कोच मात्र 'भारतीय'! कोण आहेत सिद्धार्थ लाहिरी?

India Vs England 2nd Test : शोएब बशीर दुसऱ्या कसोटीत
India Vs England 2nd Test
India Vs England 2nd Testesakal
Updated on

India Vs England 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा विशाखापट्टणम येथे होणार आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने पहिला कसोटी सामना 28 धावांनी जिंकत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजीने भारताला चांगलेच दमवले होते. आता दुसऱ्या कसोटीत तर केएल राहुल, रविंद्र जडेजा दुखापतीमुळे खेळणार नाहीये. त्यामुळे भारतीय फलंदाजी कमकवूत झाली आहे.

आता तर दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा अजून एक फिरकी गोलंदाज शोएब बशीर देखील संघात सामील झाला आहे. तो पहिल्या कसोटीपर्यंत भारतात दाखल झाला नव्हता. बशीरच्या येण्याने इंग्लंडची फिरकी अजून मजबूत झाली आहे.

India Vs England 2nd Test
Mayank Agarwal : कमबॅकची तयारी.... मयांक अग्रवालची आली पहिली प्रतिक्रिया

मॅक्युलमने घातली बशीरची भीती

शोएब बशीर भारतात दाखल होताच इंग्लंडचा प्रशिक्षक बँडन मॅक्युलमच्या आनंद गगनात मावत नाहीये. त्याने जर गरज पडली तर विशापट्टणममध्ये इंग्लंड आपली पूर्ण फिरकी फौज मैदानात उतरवेल असे सांगितले आहे. शोएब हा मूळचा पाकिस्तानचा आहे. विशेष म्हणजे भारतीय मूळ असलेले सिद्धार्थ लाहिरी हे त्याचे गुरू आहेत. ते इंग्लंडमधील रॉयल अकॅडमीचे प्रमुख आहेत.

लाहिरी यांनी केली शोएबची स्तुती

लाहिरीने आपल्या शिष्याची स्तुती केली होती. त्यांनी बशीरची इंग्लंड संघात निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली की, 'मी हे नक्कीच सांगू इच्छितो की जर बशीरने डोळ्यावर पट्टी बांधून जरी गोलंदाजी केली तरी तो चांगलीच गोलंदाजी करेल. तो येत्या काळात खूप प्रसिद्ध होणार आहे.

बशीर ज्यावेळी भारतीय खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करेल त्यावेळी लक्षात येईल की दिग्गज भारतीय फलंदाजांसमोर त्याचा निभाव लागणार आहे की नाही.

India Vs England 2nd Test
Jay Shah ACC President : मोठी घोषणा! BCCI चे सचिव जय शाह सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष

कोण आहेत सिद्धार्थ लाहिरी?

द टेलीग्राफने दिलेल्या वृत्तानुसार 2003 मध्ये निराश झालेला सिद्धार्थ लाहिरी इंग्लंडमध्ये गेला. त्याने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाची कोचिंग बॅच घेण्यासाठी लंडनमध्ये गेले होते. ते मिडलसेक्समध्ये असताना इसीबीचे लेवल 1 आणि लेवल 2 कोचिंग परीक्षा पास झाले. त्यानंतर काऊंटीने त्यांची कोचिंगच्या लेवल 3 साठी शिफारस केली. याबाबत बोलताना सिद्धार्थ म्हणाले की, सुरूवातीला त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता. कोणत्याही अनुभवाशिवाय मी क्रिकेट कोचिंगच्या जगतात आपला प्रवास सुरू केला होता.

सिद्धार्थ लाहिरींच्या कारकीर्दीचा हा ठरला टर्निंग पॉईंट

सिद्धार्थने लेवल 3 कोचिंग पास केल्यानंतर ते सरेमध्ये कोचिंगची संधी शोधत होते. त्यावेळी कोबम, सरे येथील स्टॉक डीएबरनॉन सीसी क्लबमध्ये संधी मिळाली. मी शनिवारी आठवड्यातून एकदा क्रिकेट खेळत होतो. त्यानंतर मी प्रसिद्ध होऊ लागलो. त्यानंतर माझी कारकीर्द बदलली.

मला सर्वात पहिल्यांदा पार्कसाईड स्कूलमध्ये प्रशिक्षक म्हणून नोकरी मिळाली. त्यावेळीचे मख्याध्यापक डेविड आयलवर्ड यांनी माझ्यावर विश्वास ठेवला अन् मला संधी दिली. त्यानंतर आम्ही स्टार क्रिकेट अकॅडमी सुरू केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.