Shoaib Malik Match Fixing : शोएब मलिकचा BPL चा करार मॅच फिक्सिंगमुळं झाला रद्द..? पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणतो...

Shoaib Malik Match Fixing
Shoaib Malik Match Fixingesakal
Updated on

Shoaib Malik Match Fixing : पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकचे बांगलादेश प्रीमियर लीगमधील संघासोबतचा करार हा मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे रद्द झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर आता शोएब मलिकची प्रतिक्रिया आली आहे. काही माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार मलिक हा मॅच फिक्सिंग प्रकरणी चौकशीच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

Shoaib Malik Match Fixing
IND vs ENG : भारतीय फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांचा घेतला समाचार; तिसऱ्याच दिवशी निकाल लावणार?

शोएब मलिकने बांगलादेश प्रीमियर लीगमधील फॉर्च्युन बारिशाल संघाकडून खेळताना खुलना टायगर्स विरूद्धच्या सामन्यात एकाच षटकात तीन नो बॉल टाकले होते. त्यानंतर संघाने त्याच्यासोबतचा करार रद्द केल्याचे वृत्त आले आहे. मात्र शोएब मलिकने एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत फ्रेंचायजीसोबतचा करार संपवणे हे आधीच ठरले होते. त्याचा मॅच फिक्सिंगच्या अफवांशी काही संबंध नाही. मॅच फिक्सिंगची अफवा खोटी असल्याचेही तो म्हणाला.

Shoaib Malik Match Fixing
Shubman Gill : माझी मदत केली आता गिलचीही कर... राहुल द्रविडने पिटरसनला असं काय सांगितलं होत?

शोएब मलिक आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हणतो की, 'मी मॅच फिक्सिंग केल्याची अफवा पसरल्यानंतर माझा फॉर्च्युन संघासोबतचा करार रद्द झाल्याचे वृत्त खोडून काढतो. मी आमचा कर्णधार तमिम इक्बालशी चर्चा केली होती आणि दोघांनी मिळून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मी बांगलादेश सोडण्याचा निर्णय हा दुबईतली माझ्या दुसऱ्या काही कमिटमेंटसाठी घेतला.'

'मी फॉर्च्युन बारिशालला येणाऱ्या सामन्यांसाठी शुभेच्छा देतो. जर गरज भासली तर मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपलब्ध असेन. मला क्रिकेट खेळताना आनंद मिळतो. मी क्रिकेट खेळणं कायम ठेवणार आहे.

Shoaib Malik Match Fixing
Sania Mirza Republic Day Post : 'मी आपल्या देशाची नेहमीच...', प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सानियाची खास पोस्ट!

शोएब मलिक पुढे म्हणाला की, 'अफवांबाबत बोलायचं झालं तर मी ज्यांनी ही अफवा पसरवली आहे त्यांना इशारा देतोय. या सर्व अफवा खोट्या आहेत. एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी किंवा त्या पसवण्यापूर्वी त्याची खातरजमा करून घेणं अत्यंत गरजेचं आहे.'

'सनसनी पसरवण्याचा मोह प्रतिष्ठेला हानी पोहचवते आणि विनाकारण गोंधळ निर्माण करते. आता अचूक आणि विश्वसनीय सूत्रांना प्राधान्य देण्याची गरज आहे आणि तथ्य काय आहे हे जाणून घेण्याची गरज आहे.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()