Shreyas Iyer IND vs BAN : बांगलादेश सामन्यापूर्वीच श्रेयस अय्यरच्या दुखापतीवर आली मोठी अपडेट

IND vs BAN Shreyas Iyer
IND vs BAN Shreyas Iyer esakal
Updated on

IND vs BAN Shreyas Iyer : भारताने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव करत दिमाखात आशिया कप 2023 ची फायनल गाठली. आता भारताचा सामना हा आधीच फायनलच्या रेसमधून बाहेर गेलेल्या बांगलादेशविरूद्ध 15 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यापूर्वी आज (दि. 14) भारतीय संघाने ऐच्छिक सराव केला.

या सरावाला विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह यांनी दांडी मारली. त्यांनी आराम करणं पसंत केलं. मात्र याच सरावसत्रादरम्यान भारतासाठी एक दिलासा देणारी गोष्ट समोर आली.

पाठीच्या दुखापतीमुळे आशिया कपमधील पाकिस्तान आणि श्रीलंकेविरूद्धचा सामना न खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने आज नेटमध्ये फलंदाजीचा कसून सराव केला. तो चांगल्या प्रकारे फलंदाजी करत होता.

IND vs BAN Shreyas Iyer
Shahid Afridi Shaheen Afridi : जरा नसीम शाहकडून शिका... सासरेबुवांनी जावयाला दिला घरचा आहेर

सलग तीन दिवस सामना खेळणाऱ्या भारतीय संघाला अखेर बुधवारी सुट्टी मिळाली होती. मात्र शुक्रवारी होणाऱ्या भारत - बांगलादेश सामन्यासाठी त्यांना गुरूवारी सराव करणे गरजेचे होते. संघ व्यवस्थापनाने हे सराव सत्र ऐच्छिक ठेवले होते. त्यामुळे संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंनी विश्रांती घेणेच पसंत केले.

हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी वर्कलोड मॅनेजमेंटनुसार नेट्समध्ये सराव केला नाही. सलग सामना खेळणारे रोहित शर्मा आणि विराट कोहलीने देखील सराव सत्राला दांडी मारली.

या ऐच्छिक सरावात श्रेयस अय्यर सोबत फक्त शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा आणि तिलक वर्मा यांनी सहभाग नोंदवला. आनंदाची गोष्ट म्हणजे श्रेयस अय्यरने पुन्हा फलंदाजी करण्यास सुरूवात केली आहे. तो पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे. तो पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरूद्धच्या दोन्ही सामन्यांना मुकला होता.

IND vs BAN Shreyas Iyer
Harmanpreet Kaur : फक्त हरमनप्रीतच! ना विराट ना रोहित... Times’s list of 100 leaders मध्ये हार्दिकचंही नाही नाव

मात्र आता तो फलंदाजी करू लागला असल्याने हे भारतीय क्रिकेट संघासाठी चांगले संकेत आहेत. आशिया कपनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध देखील तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

आशिया कपसाठीचा भारतीय संघ :

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.