Shreyas Iyer : वर्ल्डकप 2023 मधील भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 357 धावा केल्या. यात शुभमन गिलने 92 विराट कोहलीने 88 तर श्रेयस अय्यरने 82 धावांची दमदार खेळी केली.
श्रेयस अय्यरने 146.43 च्या स्ट्राईक रेटने 56 चेंडूत 82 धावा केल्या. त्यात 6 षटकार आणि 3 चौकार मारले. विशेष म्हणजे या सहा षटकारांमध्ये एक विक्रमी षटकार देखील ठरला. मात्र हा विक्रम श्रेयस अय्यर सारखा स्लीम खेळाडू करेल असे कोणालाही वाटले नाही.
श्रेयस अय्यरने यंदाच्या वर्ल्डकपमधील सर्वात लांब षटकार मारत विक्रम केला. श्रेयस अय्यरने कुसल रजिथाच्या गोलंदाजीवर 106 मीटर लांब षटकार मारला. त्याने ग्लेन मॅक्सवेलच्या 104 मीटर षटकाराचा विक्रम देखील मोडला. यापूर्वी अय्यरने 101 मीटर लांब षटकार मारला होता. त्याने आपलाच विक्रम मोडला.
श्रेयस अय्यरने आज वनडे क्रिकेटमधील आपल्या 2000 धावा देखील पूर्ण केल्या. तो वनडेमध्ये सर्वात वेगाने 2000 धावा पूर्ण करणाऱ्यांच्या यादीतील तिसरा खेळाडू ठरला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने श्रीलंकेविरूद्ध 50 षटकात बाद 357 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर शुभमन गिलने 92 विराट कोहलीने 88 तर श्रेयस अय्यरने 82 धावांची खेळी केली. दुर्दैवाने भारताच्या एकाही फलंदाजाचे आज शतक पूर्ण झाले नाही. स्लॉग ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी करत रविंद्र जडेजाने 24 चेंडूत 35 धावांचे योगदान दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.