Shreyas Iyer : पत्रकाराच्या प्रश्नावर श्रेयस संतापतो तेव्हा...

उसळते चेंडू खेळता येत नाहीत? तुम्हाला काय म्हणायचेय!
Shreyas Iyer
Indian cricketer
Shreyas Iyer Indian cricketersakal
Updated on

मुंबई - श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मैदानावर तुफान फटकेबाजी करणाऱ्या श्रेयस अय्यरने सामना संपल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत तेवढीच शाब्दिक फटकेबाजी केली. उसळत्या चेंडूच्या प्रश्नावर भडकलेल्या श्रेयसने पत्रकारालाच सुनावले.

उसळत्या चेंडूवर पूलचा फटका मारताना श्रेयस बाद होणे हे खुले सत्य आहे. गेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो अशाच प्रकारच्या चेंडूवर विकेट बहाल करुन बाद झाला होता. अशी चूक पुन्हा होऊ नये म्हणून मुंबईतील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी त्याने भरपूर सरावही केला होता.

श्रीलंकेकडे उसळते चेंडू टाकणारे तेवढे वेगवान गोलंदाज नव्हते याचा फायदा झालेल्या श्रेयसने या सामन्यात तीन चौकार आणि सहा षटकारांच्या सहाय्याने ८२ धावांची खेळी उभारली त्यातील एक षटकार तर फार दूरवर गेला होता.

भारताने दणदणीत विजय मिळवल्यानंतर श्रेयस पत्रकार परिषदेस आला आणि ``उसळते चेंडू खेळणे ही तुझी अडचण आहे त्यावर तु कशी मात केलीस...`` हा पहिलाच प्रश्न त्याच्या संयमाला आव्हान देणारा होता.

Shreyas Iyer
Indian cricketer
Shreyas Iyer : 'मी किती पुल शॉट्स खेळले पाहिले का?' शॉर्ट बॉलच्या प्रश्नावर श्रेयस अय्यर संतापला

`माझ्यासाठी अडचण...तुम्हाला काय म्हणायेय..`` असे प्रत्युत्तर देत श्रेयसने शाब्दिक फटकेबाजी सुरू केली... पूलच्या फटक्यावर मी किती धावा केल्या हे तुम्ही पाहिल्यात का? किती चौकार गेले हे तुम्ही मोजलेत का? माझ्यासाठी आखूड टप्याचे चेंडू खेळणे ही अडचण नाही, अशी उत्तरे देऊनही श्रेयस थांबला नाही...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.