Team India : आशिया चषकापूर्वी वाईट बातमी; श्रेयस अय्यरच्या एका इंजेक्शनने टीम इंडियाच्या वाढल्या अडचणी

Shreyas Iyer Injury Update
Shreyas Iyer Injury Update sakal
Updated on

Shreyas Iyer Injury Update : श्रेयस अय्यरच्या इंजेक्शनमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. आता त्याच्यासाठी आशिया कप 2023 खेळणे कुठेतरी कठीण दिसत आहे. खरं तर या वर्षाच्या सुरुवातीला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये त्याच्या पाठीला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. दुखापतीमुळे अय्यर आयपीएल किंवा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलही खेळू शकला नाही.

Shreyas Iyer Injury Update
MS Dhoni : 'माय लव्ह...' साक्षी तिच्या शेजारी होती तरी एअर होस्टेसने धोनीला दिली चिठ्ठी अन्...

श्रेयस अय्यर सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसनावर आहे. परंतु टाईम्स ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, त्याला अजूनही पाठीच्या समस्या आहेत. रिपोर्टनुसार, अय्यरने नुकतेच एनसीएमध्ये पाठदुखीसाठी इंजेक्शन घेतले होते. त्याच्या पाठीत अजूनही दुखत आहे. एप्रिलमध्ये लंडनमध्ये अय्यरच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेपूर्वी तो भारतीय एकदिवसीय संघाचा महत्त्वाचा भाग होता.

Shreyas Iyer Injury Update
IND vs WI : '...निवडकर्ते मूर्ख आहेत का?' सरफराज खानला टीम इंडियातून डावलल्यानंतर BCCIचं स्पष्टीकरण

दुखापतीमुळे त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यावरही भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला फिट होण्यासाठी 3 महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागेल. म्हणजेच आशिया चषक खेळणेच त्याला अवघड जात नाही, तर विश्वचषक खेळणेही त्याला कठीण जात आहे. आशिया चषक 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन्ही देश एकत्र यजमान असतील.

Shreyas Iyer Injury Update
Shah Rukh Khan On Rinku Singh: शाहरुख खान रिंकू सिंगला का म्हणाला - बाप, सोशल मीडियावर उडाली खळबळ

आशिया चषक एकदिवसीय स्वरूपात खेळला जाईल, जो ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार्‍या 2023 विश्वचषकापूर्वी एक प्रमुख स्पर्धा असेल. प्रत्येक संघ विश्वचषकाची तयारी म्हणूनही आशिया चषकाकडे पाहत आहे.

अशा परिस्थितीत श्रेयस अय्यरचे विश्वचषक खेळणे धोक्यात आले आहे. अय्यरला येत्या काही महिन्यांत पुनरागमन करणे कठीण जात असताना जसप्रीत बुमराह पुनरागमनाच्या तयारीत आहे. तो आयर्लंडविरुद्ध टीम इंडियात पुनरागमन करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.