Shreyas Iyer : प्रत्येक खेळाडूंनी योग्य वेळी कामगिरी उंचावत नेली

केवळ अंतिम सामनाच नव्हे तर संपूर्ण मोसमात आम्ही अजिंक्य संघासारखा खेळ केला, असे गौरवोद्गार विजेत्या कोलकता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने काढले.
shreyas iyer
shreyas iyersakal
Updated on

चेन्नई - केवळ अंतिम सामनाच नव्हे तर संपूर्ण मोसमात आम्ही अजिंक्य संघासारखा खेळ केला, असे गौरवोद्गार विजेत्या कोलकता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने काढले.

कोलकता संघाला तिसऱ्यांदा विजेता करणारा कर्णधार या यशानंतर भारावला होता. गतवर्षी त्याला दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर राहावे लागले होते. विजयोत्सव करण्यासारखे आमच्याकडे बरेच काही आहे. अशाच कामगिरीची आम्ही प्रत्येक खेळाडूकडून अपेक्षा करत होतो, असे श्रेयसने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

योग्य आणि महत्त्वाच्या वेळी आम्ही सर्वांनी अधिक जोमाने खेळ केला. दरार निर्माण करणारी अशी ही कामगिरी होती, माझ्याकडे आता शब्द कमी पडत आहेत, असे तो म्हणाला.

आयपीएल विजेतेपद मिळवून दिले असले तरी श्रेयसला आता काही काळ तर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांतच खेळावे लागणार आहे. बीसीसीआयने वार्षिक करारातून त्याला दूर केलेले आहे. देशाकडून सध्या तरी खेळू शकणार नसलो तरी स्पर्धात्मक क्रिकेट मी कायम ठेवणार आहे, असे त्याने सांगितले.

श्रेयसने कोलकता संघाचा हुकमी गोलंदाज मिचेल स्टार्कचे खासकरून कौतुक केले. पॉवरप्लेमध्ये त्याने हैदरादच्या दोन विकेट मिळवल्या आणि तेथूनच सामन्यात कोलकता संघाने आपली पकड घट्ट करण्यास सुरुवात केली.

असे मोठे आणि दिग्गज खेळाडू महत्त्वाच्या सामन्यात बरोबरी आपली कामगिरी उंचावतात. अंतिम सामना हा नेहमीच अतिरिक्त दडपण असलेला असतो. स्टार्कने या सामन्यात आपले सर्वस्व पणास लावले. कोठेही तो मागे पडला नाही, असे शब्दात श्रेयसने त्याचे कौतुक केले.

वेस्ट इंडीजचा अष्टपैलू आंद्र रसेल यालाही श्रेयसने शाबासकी दिली. हैदराबादविरुद्धच्या या अंतिम सामन्यात रसेलने तीन विकेट मिळवल्या. रसेलच्या हातात जादू आहे. जेव्हा जेव्हा त्याच्याकडे चेंडू दिला, त्यावेळी त्याने विकेट मिळवून दिल्या. संघातील सर्व जण योग्य वेळी पुढे येऊन आपापले योगदान देत होते, त्यामुळे आमच्याकडून परिपूर्ण कामगिरी झाली, असे श्रेयसने सांगितले.

चारीमुंड्या चीत झालो : कमिंस

अंतिम सामन्यात कोलकता संघाने आम्हाला चारीमुंड्या चीत केले, अशी कबुली हैदराबाद संघाचा कर्णधार पॅट कमिंसने दिली. त्यांनी फारच चांगली गोलंदाजी केली. त्यांनी आम्हाला लढण्यासाठी काहीच शिल्लक ठेवले नाही. खेळपट्टी वेगळी होती. २०० पेक्षा अधिक धावा शक्य नव्हत्या. कदाचित १६० पर्यंत धावा केल्या असत्या तर आमचीही शक्यता वाढली असती, असे कमिंस म्हणाला.

अंतिम सामन्यात एकतर्फी हार झाली असली तरी कमिंसने हैदराबाद संघातील सर्वांचे आभार मानले आणि त्यांचे कौतुकही केले. संघातील बहुतेक खेळाडू माझ्यासाठी नवे होते; पण त्या सर्वांनी चांगला लढा दिला. भारतात ‘निळ्या सागराच्या’विरोधात आम्ही बहुतेकदा खेळलेलो आहे; पण यावेळी हैदराबादमध्ये सर्व प्रेक्षक आमच्या बाजूने होते, हा एक वेगळा अनुभव होता, असेही कमिंसने सांगितले.

आयपीएलमध्ये सर्वाधिक २४.७५ कोटींची रक्कम आपल्याला मिळाली आहे, याचे दडपण नव्हते. याउलट मी खेळाचा आनंद घेत होतो, असे मिचेल स्टार्क म्हणाला. सुरुवातीच्या टप्प्यात अपयशी ठरलेल्या स्टार्कने उत्तरार्धात मात्र निर्णायक कामगिरी केली.

सर्वाधिक पैसे आपल्याला मिळाले असल्याचे बोलले जात होते; परंतु त्यापेक्षाही माझ्याकडे असलेला अनुभव मोठा आहे. आणि त्याच्या जोरावरच मी यशस्वी ठरलो. आमची संपूर्ण गोलंदाजी बहारदार होती, प्रत्येक जण मॅचविनर होता, त्यामुळे प्रत्येकावरचे दडपण कमी झाले होते. परिणामी, आम्ही सर्वच जण खेळाचा अधिक आनंद घेत होतो, असे स्टार्क म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com