Shreyas Iyer News : आयपीएल 2023 ची उलटी गिनती सुरू झाली आहे. सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान भारताचा मोठा स्टार फलंदाज लीगमधून बाहेर असल्याच्या बातम्या येत आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर संपूर्ण हंगामासाठी बाहेर गेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटी सामन्यादरम्यान अय्यरला पाठीला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतूनही बाहेर गेला होता.(Latest Sport News)
अय्यरच्या दुखापतीने कोलकाता नाईट रायडर्सलाच धक्का बसला नाही, तर भारतीय संघालाही मोठा धक्का बसला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतूनही तो बाहेर जाऊ शकतो.
बुधवारी आलेल्या एका बातमीनुसार त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या मार्गदर्शनाखाली लंडन किंवा भारतात त्याची शस्त्रक्रिया होऊ शकते.
रिपोर्ट्सनुसार, अय्यर यांना मुंबईतील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. शस्त्रक्रियेनंतर त्याला किमान ५ महिने मैदानापासून दूर राहावे लागणार आहे.
5 महिने मैदानापासून दूर राहण्याचा अर्थ असा आहे की, तो 31 मार्चपासून सुरू होणारी IPL 2023 आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम लढत खेळू शकणार नाही.
अय्यरची दुखापत हा भारतासाठी आणखी एक मोठा धक्का आहे. पहिला धक्का जसप्रीत बुमराहच्या रूपाने बसला, जो दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकही खेळू शकला नाही.
अय्यरच्या आयपीएलमधून बाहेर पडल्याने केकेआरलाही मोठा फटका बसणार आहे. फ्रँचायझीने त्याला गेल्या हंगामात 12.25 कोटी रुपयांना विकत घेतले आणि त्याला कर्णधार बनवले.
स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी जेमतेम 10 दिवस उरले आहेत. अशा स्थितीत केकेआरसमोर या 10 दिवसांत नवा कर्णधार निवडण्याचे आव्हान आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.