Shreyas Iyer IND vs ENG : आता निवड समिती बसेल अन्.... जहीरनं सांगितलं गिलच्या अर्धशतकानं अय्यरची झाली अडचण

Shreyas Iyer IND vs ENG : श्रेयस अय्यरने सेट होऊन खराब फटका मारून स्वतःच्यात पायावर कुऱ्हाड मारून घेतली.
Shreyas Iyer IND vs ENG : आता निवड समिती बसेल अन्.... जहीरनं सांगितलं गिलच्या अर्धशतकानं अय्यरची झाली अडचण
Updated on

Shreyas Iyer IND vs ENG : दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंडने जोरदार पुनरागमन करत भारतीय संघाचं टेन्शन वाढवलं. पहिल्याच सत्रात इंग्लंडने भारताचे चार फलंदाज बाद करत सामन्याचं पारडं समसमान केलं आहे. जेम्स अँडरसनने भारताच्या दोन्ही सलामीवीरांची शिकार केली.

यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरत 81 धावांची दमदार भागीदारी रचली. दरम्यान शुभमन गिलने कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पहिल्यांदाच अर्धशतकी मजल मारली. श्रेयस अय्यर चांगला फलंदाजी करत होता. मात्र टॉम हार्टलीच्या गोलंदाजीवर एक मोठा फटका मारण्याच्या नादात 29 धावांवर झेलबाद झाला.

Shreyas Iyer IND vs ENG : आता निवड समिती बसेल अन्.... जहीरनं सांगितलं गिलच्या अर्धशतकानं अय्यरची झाली अडचण
Ind vs Eng 2nd Test Day 3 : आक्रमक सुरूवात करणाऱ्या इंग्लंडला भारताने दिला धक्का, तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडच्या 67 धावा

जरी अय्यरने गिलसोबत अत्यंत महत्वाची भागीदारी रचली असली तरी त्याचं तिसऱ्या सामन्यात प्लेईंग 11 मधील स्थान धोक्यात आलं आहे. याबाबत भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खानने जिओ सिनेमावर बोलताना एक मोठी चिंता बोलून दाखवलं.

जहीर खान म्हणाला की, 'आता पुढच्या कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआयची निवडसमिती संघ निवडण्यासाठी बसेल. तिसऱ्या सामन्यात केएल राहुल आणि विराट कोहली संघात परतण्याची शक्यता आहे. हे दोन खेळाडू असे आहेत जे थेट प्लेईंग 11 मध्ये येतील. त्यामुळे दोन खेळाडूंना बाहेर जावं लागणार आहे.

अय्यरने जो फटका मारला, पहिल्या दोन कसोटीत फलंदाजी केली त्यावरून निवडसमिती नक्कीच विचार करेल. दुसरीकडे शुभमन गिलने महत्वाच्या क्षणी आपला खेळ उंचावत अर्धशतक ठोकले. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये जागा मिळवण्यासाठी त्याचे पारडे नक्कीच जड झाले आहे. अय्यरने मात्र आपली डोकेदुखी वाढवून घेतली आहे.'

Shreyas Iyer IND vs ENG : आता निवड समिती बसेल अन्.... जहीरनं सांगितलं गिलच्या अर्धशतकानं अय्यरची झाली अडचण
Ind vs Eng : अँडरसनच्या रिव्हर्सने रोहितला सपशेल गंडवले; खराब कामगिरीमुळे कर्णधार अडचणीत?

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारताने तिसऱ्या दिवशी लंचपर्यंत दुसऱ्या डावात 273 धावांची आघाडी घेतली आहे. शुभमन गिल अजून क्रिजवर असून त्याला साथ देण्यासाठी आता अक्षर पटेल आला आहे. तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा 13, यशस्वी जैस्वाल 17 तर श्रेयस अय्यर 29 आणि रजत पाटीदार 9 धावा करून बाद झाला.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()