IND vs AUS 4th Test : शुभमन गिलचे झाले, कोहली आहे मार्गावर.. तिसऱ्या दिवशी भारत पोहचला 300 च्या जवळ

India vs Australia 4th Test Day 3
India vs Australia 4th Test Day 3 esakal
Updated on

India vs Australia 4th Test Day 3 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि शेवटच्या कसोटीचा तिसारा दिवस संपला. तिसऱ्या दिवसअखेर भारताने आपल्या पहिल्या डावात 3 बाद 289 धावांपर्यंत मजल मारली. भारत अजून पहिल्या डावात 191 धावांनी पिछाडीवर आहे.

तिसऱ्या दिवसाचा हिरो ठरला तो 23 वर्षाचा शुभमन गिल! त्याने 235 चेंडूत 128 धावांची दमदार शतकी खेळी केली. ही त्याची कारकिर्दीतील दुसरी शतकी खेळी आहे. याचबोबर चेतेश्वर पुजाराने 42 तर विराट कोहलीने अर्धशतकी ( 59 ) खेळी करत भारताला तिसऱ्या दिवशी 300 च्या जवळ पोहचवले.

India vs Australia 4th Test Day 3
Cheteshwar Pujara : अर्धशतक हुकले मात्र पुजाराने विराटला जमलं नाही ते करून दाखवलंय!

अहदाबाद येथे खेळवल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने बिनबाद 36 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. दुसऱ्या दिवशी नाबाद असलेल्या रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने आपली सलामीची भागीदारी 74 धावांपर्यंत पोहचवली होती.

मात्र कूहमनचा एक शॉर्ट बॉल कव्हर्समधून पंच करताना रोहितला चेंडू खाली ठेवता आला नाही. तो लाबुशानेकडे झेल देऊन परतला. रोहित शर्मा 35 धावांवर बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव पुढे नेण्यास सुरूवात केली.

सेट झालेल्या शुभमन गिलने अर्धशतक पूर्ण केले. धावफलक हालता ठेवण्याचे काम गिलने आपल्या हातात घेतले. तर चेतेश्वर पुजारा त्याला दुसऱ्या एन्डने अँकर इनिंग खेळत साथ देत होता. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची शतकी भागीदारी रचली. दरम्यान, गिलने आपले कसोटीतील दुसरे शतक देखील पूर्ण केले.

India vs Australia 4th Test Day 3
Sania Mirza : सानिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवलेलं पत्र शेअर करत म्हणाली; मी देशासाठी खेळताना...

मात्र पुजाराला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. तो 42 धावा करून मर्फीच्या गोलंदाजीवर पायचित झाला. पुजारानंतर आलेल्या विराट कोहलीने पाटा खेळपट्टीवर आपला जम बसवण्यात फार वेळ लावला नाही. यामुळेच गिल आणि विराट कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी रचत संघाला 250 च्या जवळ पोहचवले.

पायात गोळे येऊ लागल्याने शुभमन गिलच्या फूटवर्कवर परिणाम झाला आणि तो 128 धावा करून लायनच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर विराटने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत अर्धशतकी खेळी केली. त्याला रविंद्र जडेजाने सावध फलंदाजी करत साथ दिली. अखेर 42 चेंडू खेळल्यानंतर जडेजाने षटकार मारत दुहेरी आकडा गाठला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताने 3 बाद 289 धावा केल्या होत्या. विराट कोहली 59 धावांवर तर रविंद्र जडेजा 16 धावा करून नाबाद होता.

(Sports Latest News)

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.