WI vs IND : शुभमन गिलच्या पहिल्या वहिल्या शतकात पावसाचा खोडा

Shubman Gill First ODI Century Missed Due To Rain During West Indies Vs India 3rd ODI
Shubman Gill First ODI Century Missed Due To Rain During West Indies Vs India 3rd ODIesakal
Updated on

त्रिनिदाद : तिसऱ्या वनडेत (West Indies Vs India) प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने विंडीजचे गोलंदाज आणि पाऊस यांचा सामना करत अखेर आपला पहिला डावा संपवला. भारताने 36 षटकात 3 बाद 225 धावा केल्या. मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार सामना 35 षटकांचा झाला आणि विंडीजसमोर 257 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. विशेष म्हणजे भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) अपल्या पहिल्या वहिल्या वनडे शतकापासून (Century) अवघा 2 धावा दूर असताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भारताचा डाव 36 षटकांवरच संपवण्यात आला. भारताकडून शिखर धवनने 58 तर श्रेयस अय्यरने 44 धावांची खेळी केली.

Shubman Gill First ODI Century Missed Due To Rain During West Indies Vs India 3rd ODI
Commonwealth Games 2022 : आजपासून थरार; सिंधू भारताची ध्वजधारक

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात (West Indies Vs India 3rd ODI) भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर शिखर धवन आणि शुभमन गिलने पॉवर प्लेमध्ये सावध फलंदाजी करत जम बसवला. त्यानंतर त्यांनी आक्रमक फलंदाजी करत पुन्हा एकदा 113 धावांची दमदार शतकी सलामी दिली. दरम्यान, धवन आणि गिलने आपली अर्धशतके देखील पूर्ण करून घेतली.

मात्र अर्धशतकानंतर हेडन वॉल्शने शिखर धवनला 58 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. धवन बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर फलंदाजीला आला.मात्र तो येताना पाऊस देखील घेऊन आला. त्यामुळे सामना बराच काळ थांबला होता. अखेर सामना सुरू झाला मात्र प्रत्येकी 40 षटकांचा.

ज्यावेळी पाऊस आला त्यावेळी भारताने 24 षटके फलंदाजी केली होती. त्यामुळे भारताच्या हातात फक्त 16 षटके होती. अय्यर आणि गिलने पाऊस थांबल्यानंतर धावांचा पाऊस पाडण्या सुरूवात केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 86 धावांची आक्रमक भागीदारी रचली. गिल झपाट्याने धावा करत आपल्या शतकाकडे कूच करत होता. तर अय्यरही सेट होऊन अर्धशतकाजवळ पोहचला होता.

Shubman Gill First ODI Century Missed Due To Rain During West Indies Vs India 3rd ODI
ICC Ranking : बाबार आझमने इतिहास रचला; आफ्रिदीने बुमराहला टाकेल मागे

मात्र अर्धशतकाला अवघ्या 6 धावा असताना तो बाद झाला. विशेष म्हणजे अय्यरने पहिल्या दोन वनडे सामन्यात 54 आणि 63 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. आजच्या सामन्यात जर त्याचे अर्धशतक पूर्ण झाले असते तर त्याची अर्धशतकांची हॅट्ट्रिक पूर्ण झाली असती.

दरम्यान, अय्यर बाद झाल्यानंतर शुभमन गिलने आक्रमक फलंदाजी करत 98 चेंडूत 98 धावा केल्या. नव्वदीत पोहचल्यानंतर गिल थोडासा रेंगळाला. दरम्यान, भारताच्या डावातील चार षटके शिल्लक असतानाच पावसाने पुन्हा सुरूवात केल्याने सामना पुन्हा थांबवावा लागला. पावसामुळे सामना प्रत्येकी 35 षटकांचा करण्यात आला आहे. त्यामुळे भारताचा डाव संपुष्टात आला. वेस्ट इंडीजसमोर डकवर्थ लुईस (DSL) नियमाप्रमाणे 35 षटकात 257 धावांचे आव्हान आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()