Shubman Gill : टीम इंडिया टेन्शनमध्ये! शुभमन गिल अचानक हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट, जाणून घ्या कारण

Shubman Gill Hospitalised In Chennai
Shubman Gill Hospitalised In Chennaisakal
Updated on

Shubman Gill hospitalised in Chennai : टीम इंडियासाठी टेन्शन वाढवणारी बातमी आतासमोर आली आहे. कारण भारतीय सलामीवीर शुभमन गिलची तब्येत बिघडल्याने त्याला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आले आहे.

गिलच्या प्लेटलेट्स अचानक कमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारतीय क्रिकेटपटूच्या प्रकृतीवर आणखी परिणाम होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे.

Shubman Gill Hospitalised In Chennai
World Cup 2023 Eng vs Ban : गतविजेत्यांना विजयी पुनरागमनाचे वेध; इंग्लंड अन् बांगलादेशमध्ये आज रंगणार लढत

वर्ल्ड कप 2023 सुरू होण्यापूर्वीच शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो खेळला नाही. तसेच तो अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. आणि आता रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार्‍या पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात तो खेळेल अशी शक्यता फारच कमी आहे.

Shubman Gill Hospitalised In Chennai
CWC Points Table : सलग दुसऱ्या विजयासह न्यूझीलंडचा संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर, टीम इंडिया टॉप 4 मधून बाहेर

अहमदाबादमधील गिलचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. अहमदाबादमध्येच त्याने टी-20 मध्ये पहिले शतक झळकावले. या वर्षी फेब्रुवारीमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात गिलने नाबाद 126 धावा केल्या होत्या. त्याचवेळी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना त्याने अहमदाबादमध्ये खूप धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()