Wi vs Ind 2nd Tset : भारतीय कसोटी संघातून चेतेश्वर पुजाराचे पत्ता कट झाला आहे. यानंतर शुबमन गिलला भारतीय कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत शुभमन गिलला पहिल्या कसोटी सामन्यात केवळ 6 धावा आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात 10 धावा करू बाद झाला.
गेल्या 4 कसोटी डावांमध्ये शुभमन गिलच्या बॅटमधून 13, 18, 6 आणि 10 धावा झाल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये नंबर-3 बॅटिंग पोझिशन सर्वात महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत भारतीय संघ व्यवस्थापन काही खेळाडूना नंबर-3 फलंदाजीसाठी तयार करू शकते.
बीसीसीआयला टीम इंडियात नंबर-3 बॅटिंग पोझिशनवर कोणात्या खेळाडूला संधी द्यायचे हे ठरवणे काही अवघड नाही. उलट संघाकडे क्रमांक 3 साठी एका पेक्षा एक चांगले फलंदाज आहेत. ज्यामध्ये ऋतुराज गायकवाडसह सूर्यकुमार यादव, केएल राहुल यांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादव हा उत्तम फॉर्म असलेला खेळाडू आहे. जो मैदानावर कोणत्याही बाजूने शॉट्स खेळू शकतो.
केएल राहुल हा खेळाडू तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. तो पण या पोझिशनवर खेळू शकतो. याशिवाय ऋतुराज गायकवाडलाही तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली तर तो गिलपेक्षा सरस धावा करताना दिसेल. त्यामुळे भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संघाला पुजाराची जागा लवकरच भरावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.