Ind vs Eng : विजयासाठी हव्या ९ विकेट ; गिलच्या शतकामुळे भारताला विजयाची आशा

मागील काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चमक दाखवण्यात अपयशी ठरलेल्या शुभमन गिल याने रविवारी कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावल्यामुळे भारताला दुसऱ्या डावात २५५ धावा उभारता आल्या.
cricket
cricket sakal
Updated on

विशाखापट्टण : मागील काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चमक दाखवण्यात अपयशी ठरलेल्या शुभमन गिल याने रविवारी कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावल्यामुळे भारताला दुसऱ्या डावात २५५ धावा उभारता आल्या. यामुळे चौथ्या डावात इंग्लंडसमोर विजयासाठी ३९९ धावांचे आव्हान उभे ठाकले. इंग्लंडच्या संघाने तिसऱ्या दिवसअखेरीस १ बाद ६७ धावा केल्या असून अद्याप त्यांना ३३२ धावांची आवश्‍यकता आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला इंग्लंडच्या नऊ विकेट मिळवण्याची गरज आहे.

भारताच्या संघाने सकाळच्या सत्रात बिनबाद २८ या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. इंग्लंडचा सर्वांत अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने रोहित शर्माचा (१३ धावा) त्रिफळा उडवला. त्यानंतर एक धावांची भर घालताच त्याने यशस्वी जयस्वालला (१७ धावा) ज्यो रूटकरवी झेलबाद केले. शुभमन गिल व श्रेयस अय्यर या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी करीत भारतासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली; पण टॉम हार्टलीच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळताना श्रेयस २९ धावांवर बाद झाला. याप्रसंगी बेन स्टोक्सने मागे धावत जाऊन घेतलेला झेल उत्कृष्ट ठरला. रेहान अहमदने रजत पाटीदारला ९ धावांवर बाद करीत भारताला चौथा धक्का दिला.

cricket
IND vs ENG 2nd Test : पतौडी-कुंदरननंतर... यशस्वी अन् गिलनं केली 60 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती

८९ धावांची भागीदारी

शुभमन गिल व अक्षर पटेल या जोडीने पाचव्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी करताना भारताची धावसंख्या दोनशेच्या वर नेली. गिलने यादरम्यान शतकी खेळीही साजरी केली. शोएब बशीरच्या गोलंदाजीवर रिव्हर्सचा फटका खेळताना तो यष्टिरक्षक बेन फोक्सकरवी झेलबाद झाला. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितल्यानंतर त्याला बाद देण्यात आले. गिलच्या ग्लोव्हस्‌ला लागून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट दिसले. गिलने १०४ धावांची खेळी ११ चौकार व २ षटकारांनी सजवली. टॉम हार्टलीचा खाली राहणाऱ्या चेंडूवर अक्षर पटेल ४५ धावांवर पायचीत बाद झाला. त्यानंतर रविचंद्रन अश्‍विनने २९ धावांची खेळी करीत थोडीफार झुंज दिली. भारताला दुसऱ्या डावात २५५ धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडकडून टॉम हार्टली याने ७७ धावा देत चार फलंदाज बाद केले.

ज्यो रूटला दुखापत

इंग्लंडचा प्रमुख फलंदाज ज्यो रुट याच्या बोटांना दुखापत झाली आहे. सकाळी झेल घेण्याचा सराव करीत असताना त्याला दुखापत झाली होती. तसेच प्रत्यक्षात खेळतानाही त्याला दुखापतीला सामोरे जावे लागले. दिवसाचा खेळ संपल्यानंतर जेम्स अँडरसन यानेही ज्यो रुटच्या दुखापतीबाबत मत व्यक्त केले.

तो म्हणाला, रुटच्या बोटांना दुखापत झाली आहे; पण तो उद्या फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. दरम्यान, रुटच्या फलंदाजीवरही इंग्लंडचे भवितव्य अवलंबून असेल.

संक्षिप्त धावफलक

भारत - पहिला डाव ३९६ धावा आणि दुसरा डाव २५५ धावा (यशस्वी जयस्वाल १७, रोहित शर्मा १३, शुभमन गिल १०४ - १४७ चेंडू, ११ चौकार, २ षटकार, श्रेयस अय्यर २९, अक्षर पटेल ४५, रवीचंद्रन अश्‍विन २९, टॉम हार्टली ४/७७) वि. इंग्लंड - पहिला डाव २५३ धावा आणि दुसरा डाव १ बाद ६७ धावा (झॅक क्राऊली खेळत आहे २९, रेहान अहमद खेळत आहे ९, रविचंद्रन अश्‍विन १/८).

अर्धशतकी भागीनंतर विकेट

३९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडने दुसऱ्या डावाची सुरुवात आश्‍वासक केली. बेन डकेट व झॅक क्राऊली या जोडीने ५० धावांची भागीदारी रचली; पण रविचंद्रन अश्‍विनच्या गोलंदाजीवर डकेट २८ धावांवर बाद झाला. त्यानंतर नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला रेहान अहमदाला पाठवण्यात आले. क्राऊली २९ धावांवर, तर अहमद ९ धावांवर खेळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.