Shubman Gill Wicket Controversy WTC : तिसऱ्या पंचांची कांगारूंना मदत... झाली गिलला OUT देण्याची घाई?

Shubman Gill Wicket Controversy WTC
Shubman Gill Wicket Controversy WTC esakal
Updated on

Shubman Gill Wicket Controversy WTC : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC Final सामना हा ऐतिहासिक वळणावर येऊन ठेपला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. त्यानंतर दुसरा डाव 8 बाद 270 धावांवर घोषित केला. यामुळे भारताला आता चौथ्या डावात 444 धावांचा डोंगर पार करायचा आहे. जर भारताने 444 धावा चेस केल्या तर कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात सर्वात मोठे टार्गेट चेस करण्याचा इतिहास भारताच्या नावावर नोंदवला जाईल.

Shubman Gill Wicket Controversy WTC
Rahul Dravid WTC Final : कोच म्हणून राहुल द्रविड शून्य... माजी पाकिस्तानी खेळाडूने केली बोचरी टीका

भारतीय सलामीवीर ज्यावेळी क्रीजवर आले त्यावेळी त्यांनी ही धावसंख्या पार करून सामना जिंकण्याच्या इराद्याने आपण मैदात उतरल्याचे दाखवून दिले. रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत धावा करण्यावर भर दिला. त्यानंतर शुभमन गिलने देखील धावांची गती वाढवली होती. या दोघांनी भारताला 7 व्या षटकात 41 धावांपर्यंत मजल मारून दिली.

मात्र स्टॉट बोलँड टाकत असलेल्या आठव्या षटकाचा पहिला चेंडू शुभमन गिलच्या बॅटची कडा घेऊन स्लीपमध्ये उभ्या असलेल्या ग्रीनकडे गेला. चेंडू डीप होत असल्याने ग्रीनने डाईव्ह मारत झेल एका हातात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू त्याच्या बोटांमध्ये फसला आणि तो खाली ग्राऊंडला घासला असे रिप्लेमध्ये आढळून आले. मात्र तिसऱ्या पंचांनी हा वादग्रस्त झेल झूम करून पाहण्याची तसदी देखील घेतली नाही. त्यांनी गिलला थेट बाद देऊन टाकले.

Shubman Gill Wicket Controversy WTC
Wrestlers Protest: फक्त ब्रिजभुषणच नव्हे इतरही अनेकजण...; फिजोथेरपिस्टच्या नव्या आरोपांनी खळबळ

यानंतर भारतीय समालोचकांनी तिसऱ्या पंचांच्या या निर्णयावर जोरदार टीका केली. रवी शास्त्री म्हणाले की, जर शुभमन गिलच्या जागी तर स्टीव्ह स्मिथ असता तर त्याला नाबाद ठरवलं असतं. या वक्तव्यानंतर रवी शास्त्री ट्विटवर ट्रेंड करू लागले.

तसेच शुभमन गिलचा वादग्रस्त झेल पकडणारा कॅमरून ग्रीन ज्यावेळी गोलंदाजीला आला त्यावेळी प्रेक्षकांमधून चीटर चीटर अशा घोषणा देण्याचा आवाज ऐकू येऊ लागला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.