Zimbabwe vs India 3rd ODI : झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने झुंजार 115 धावांची शतकी खेळी करत भारताचे टेन्शन वाढवले होते. मात्र अखेर भारताने शेवटच्या षटकापर्यंत गेलेला सामना 13 धावांनी जिंकत मालिका 3 - 0 अशी खिशात टाकली. भारताने झिम्बाब्वेसमोर 190 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र झिम्बाब्वेला 49.3 षटकात सर्वाबाद 276 धावांपर्यंतच मजल मारता आली. (Sikandar Raza Fighting Hundred India Defeat Zimbabwe in 3rd ODI Won Series 3 - 0)
झिम्बाब्वेकडून सेन विलियम्सने 45 तर ब्रॅड इव्हान्स झुंजार 28 धावा केल्या. भारताकडून आवेश खानने 3 तर अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि दीपक चाहरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तत्पूर्वी भारताकडून शुभमन गिलने 130 धावांची धडाकेबाज शतकी खेळी केली. त्याला इशान किशनने 50 तर शिखर धवनने 40 धावा करून चांगली साथ दिली.
भारताने ठेवलेल्या 290 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरूवात खराब झाली. दीपक चाहरने त्यांना पहिला धक्का दिला. मात्र त्यानंतर झिम्बाब्वेच्या सेन विलियम्स आणि टॉनी मोनयोंंगा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी रचली.
दरम्यान, भारतीय फिरकीपटू अक्षर पटेल आणि कुलदीप यादवने चांगला मारा करत झिम्बाब्वेचा अवस्था 5 बाद 122 धावा अशी केली. परंतु झिम्बाब्वेच्या मधल्या फळीने झुंजार फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना चांगलेच दमवले. अनुभवी सिकंदर रझाने झुंजार शतकी खेळी केली. सिकंदरने 87 चेंडूत शंभरी पार केली. त्याने आठव्या विकेटसाठी ब्रॅड इवान्स यांच्यासोबत अर्धशतकी 80 भागीदारी रचली. या दोघांनी झिम्बाब्वेला 250 धावांपर्यंत मजल मारून दिली.
दरम्यान, सामना 18 चेंडूत 33 धावा असा जवळ आला असताना आवेश खान टाकत असलेल्या 48 व्या षटकात 16 धावा दिल्या. अखेर आवेशने शेवटच्या चेंडूवर इव्हान्सला 28 धावांवर बाद केले. याचबरोबर सिकंदर आणि इव्हान्सची 75 चेंडूत केलेली 103 धावांची झुंजार भागीदारी संपुष्टात आली.
आता सामना 12 चेंडूत 17 धावा असा आला. शार्दुल ठाकूरने 49 व्या षटकात सिकंदर रझाला 115 धावांवर बाद करत भारताचा जीव भांड्यात टाकला. सिकंदर बाद झाल्यावर सामना 8 चेंडूत 15 धावा असा आला होता. शार्दुलने 49 षटकात फक्त 2 धावा देत एक विकेट घेतली. आता शेवटच्या षटकात झिम्बाब्वेला विजयासाठी 6 चेंडूत 15 धावांची गरज होती. मात्र शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर व्हिक्टर नायूचीचा त्रिफळा उडवत सामना संपवला. भारताने सामना 13 धावांनी जिंकला.
तत्पूर्वी, कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाला तिसरा सामना जिंकून क्लीन स्वीप करायचा आहे. या सामन्यात कर्णधार राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताने झिम्बाब्वेसमोर 290 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने आठ गड्यांच्या मोबदल्यात 289 धावा केल्या. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 130 धावा केल्या. त्याच्याशिवाय इशान किशनने 50, धवनने 40 आणि कर्णधार राहुलने 30 धावा केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.