Maharashtra Kesari 2023 : अखेर 'सिकंदर' झाला महाराष्ट्र केसरी; गंगावेस तालमीच्या पठ्ठ्यानं मारलं मैदान

Sikandar Sheikh
Sikandar Sheikhesakal
Updated on

Maharashtra Kesari 2023 : गंगावेस तालमीचा पठ्ठ्या सिकंदर शेखनं अखेर महाराष्ट्र केसरीचं मैदान मारलं. त्याने गतवर्षीची हुकलेली संधी यंदा न दडता मानाची गदा आपल्या खांद्यावर घेतली. त्याने गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला अस्मान दाखवत विजेतेपद पटकावलं.

Sikandar Sheikh
Sourav Ganguly : होकार देतोस की... कॅप्टन रोहितवर सौरव गांगुलीने केली दादागिरी, त्यावेळी नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र केसरी 2023-24 च्या अंतिम सामन्यात गंगावेस तालमीत कुस्तीचे धडे गिरवणारा सिकंदर शेख आणि गतविजेता महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांच्यात यंदाची फायनल झाली. शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलणार की सिकंदर यंदाचं महाराष्ट्र केसरीचं मैदान मारत गतवर्षीच्या पराभावची सल दूर करणार याकडे कुस्ती चाहत्यांच लक्ष होतं. अखेर सिकंदर शेखनं शिवराज राक्षेला पराभव करत मानाची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली.

उपांत्या फेरीत गादी विभागात शिवराज राक्षेने हर्षद कोकाटेचा पराभव केला अन् डबल महाराष्ट्र केसरीसाठी शड्डू ठोकला. तर माती विभागात सिकंदर शेखने संदीप मोटेवर 10 - 0 असा दणदणीत विजय मिळवत यंदाची महाराष्ट्र केसरीची गदा आपलची असल्याचे संकेत दिले होते.

Sikandar Sheikh
Babar Azam Shopping In India : बाबर आझमने साडी निवडताना घेतला DRS; घरी फोन केला अन्...

सिकंदर शेख याचा मागच्या केसरी स्पर्धेमध्ये पराभव झाला होता. यंदा त्याच्याकडे नामी संधी होती. शिवराज राक्षे याने मागील वर्षी महेंद्र गायकवाड याचा पराभव करत पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीवर नाव कोरलं होतं. यंदा मात्र सिकंदर शेखनं त्याचं डबल केसरी होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()