World Surf League 2024: १८ वर्षीय तरुणीने सर्फिंगलमध्ये रचला इतिहास; ऑलिम्पिक 'सुवर्ण'विजेतीला केले पराभूत

Caity Simmers wons the World Surf League 2024: कॅलिफोर्नियाच्या कॅटी सिमर्सने सर्वात तरुण महिला जागतिक सर्फिंग चॅम्पियन बनण्याचा इतिहास रचला.
Caity Simmers
Caity Simmersesakal
Updated on

Caity Simmers: नुकत्याच झालेल्या वर्ल्ड सर्फ लीग(WSL)२०२४ मध्ये कॅलिफोर्नियाच्या १८ वर्षीय कॅटी सिमर्सने सर्वात युवा महिला जागतिक सर्फिंग चॅम्पियन बनत इतिहास रचला आहे. ६ सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात सिमर्सने पॅरिस ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिन मार्क्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. या विजयाने सिमर्ससाठी केवळ वैयक्तिक विक्रम केला नसून कॅलिफोर्नियाची सर्फिंगमधील महिला विश्वजेतेपदाची ४० वर्षांची प्रतीक्षाही संपवली आहे.

दक्षिण कॅलिफोर्नियातील लोअर ट्रेस्टल्स येथे आयोजित अंतिम सामना अटीतटीचा झाला. कारण सिमर्स आणि मार्क्स या दोघींनीही त्यांचे कौशल्य पणाला लावले होते. सिमर्सने मार्क्सकडून पहिली फेरी गमावल्यानंतर, तिने ९.६० गुण मिळवत जोरदार पुनरागमन केले. दुसऱ्या फेरीमध्ये सिमर्सने दोन ९ गुणांच्या राइड्स करत डब्ल्यूएसएल फायनल्सच्या इतिहासात सर्वाधिक गुण मिळवण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आणि स्पर्धेत मार्क्सची बरोबरी केली. निर्णायक तिसऱ्या फेरीमध्ये सिमर्सने तिची गती कायम ठेवत ८.८३ गुण मिळवले आणि ६ गुणांची आघाडी घेतली. अंतिम सामना जिंकण्यासाठी मार्क्सला ८ गुणांची गरज होती. परंतु शेवटच्या फेरीत तिला चांगली कामगिरी करता आली नाही आणि सिमर्सने स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले.

Caity Simmers
Paralympic 2024: मेडलवर सही, ग्लोव्ह्ज भेट! पॅरिसमध्ये इतिहास रचणाऱ्या भारतीय खेळाडूंसोबत पंतप्रधान मोदींची 'ग्रेट भेट', Video

कॅरोलिन मार्क्स ही वर्ल्ड सर्फ लीगमधाल गतविजेती आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सुवर्णपदक विजेती होती. इतक्या मोठ्या विद्यमान व अनुभवी खेळाडूला १८ वर्षीय कॅटी सिमर्सने पराभूत करून आपल्या कौशल्याचा जोरावर ती सर्वोत्तम सर्फर असल्याचे तिने सिद्ध केले आहे. तिच्या कारर्किदीतील हे एक मोठे यश आहे.

या विजयासह, सिमर्सने सर्फिंगच्या जगात एक उभरती स्टार खेळाडू म्हणून तिने नावलौकिक मिळवले आहे. पाच वेळा विश्वविजेत्या कॅरिसा मूरला मागे टाकत ती आता डब्ल्यूएसएल विश्व विजेतेपद जिंकणारी सर्वात तरुण महिला बनली आहे.

Caity Simmers
India vs Korea Live : चक दे इंडिया! भारतीय संघाचा विजयी चौकार; 'सरपंच' साहबची डबल सेंच्युरी

सिमर्सची ही पहिलीच मोठी कामगिरी नसून तिने २०२१ मध्ये यूएस ओपन ऑफ सर्फिंगमध्ये अवघ्या १५ व्या वर्षी तिची पहिली मोठी स्पर्धा जिंकली, ती या स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी सर्वात तरुण विजेती ठरली. तिने आंतरराष्ट्रीय सर्फिंग असोसिएशन वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड सर्फ लीग ज्युनियर चॅम्पियनशिपमध्येही विजय मिळवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.