दोन वेळची ऑलिम्पिक चॅम्पियन बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला रौप्य पदकाची कमाई करणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू (Chanu Saikhom Mirabai) वर्षातील सर्वोत्तम पुरस्काराच्या यादीत आहेत. बीबीसीच्या वर्षातील सर्वोत्तम महिला पुरस्कारांठीच्या शर्यतीत ऑलिम्पियन गोल्फर अदिती अशोक, टोकियो पॅरालिंपिकम्ये गोल्डन निशाण साधलेल्या अवनि लेखरासह बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिचाही समावेश आहे. मंगळवारी या खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली.
पुरस्कारासाठी ऑनलाइन मतदान 28 फेब्रुवारीपर्यंत होणार असून 28 मार्चला या पुरस्काराची घोषणा होईल. पुरस्काराच्या सोहळ्यात दिग्गज महिला खेळाडूला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. याशिवाय उद्योत्मुख खेळाडूलाही गौरवण्यात येईल.
यश सहज मिळत नाही : सिंधू
यश हे सहज मिळत नाही. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर निकाल येतो. प्रत्येक दिवशी एका खास प्रक्रियेतून जावे लागते. त्यानंतर तुम्ही एका विशेष उंचीपर्यंत पोहचता, अशी भावना पीव्ही सिंधून व्यक्त केली आहे.
गोल्फर आदिती अशोकही आनंदी!
अदिती म्हणाली की, मागील वर्षी खुपच चांगल होते. भारतात गोल्फला पसंती मिळते याचा आनंद वाटतो. चांगली कामगिरीमुळे पुरस्कारासाठी नामांकन मिळाले, ही गोष्ट आनंदाची आहे. हा सन्मान दिल्याबद्दल अदिती अशोक (Aditi Ashok) हिने आभारही मानले आहेत.
ट्रकमधून लिफ्ट घेत ट्रेनिंगवर पोहचायची मीराबाई
मीराबाईनेही पुरस्कारासाठी नामांकित होणं अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे. रिओ ऑलिम्पिकमधील संधी हुकल्यानंतर तिने टोकियो ऑलिम्पिकसाठी खूप मेहनत घेतली. ट्रकमधून लिफ्ट घेत ती सरावासाठी ट्रेनिंग सेंटरवर जायची. तिने मोठा संघर्ष आणि मेहनत करुन देशासाठी पदक मिळवून दाखवंल.
गरिबीचा सामना आणि दैदिप्यपान पंच
लवलीना (Lovlina Borgohain) हिने गरिबीतून मार्ग काढत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. ऑलिम्पिकमधील कामगिरीनंतर पुरस्कारासाठी निवड झाल्याने तिलाही आनंद झाला आहे. अवनी लकेरानं (Avani Lekhara) आपल्या यशात वडिलांचा मोठा आधार होता, असे सांगत आपली भावना व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.