Zimbabwe: महिला क्रिकेटरचा मृत्यू, महिन्याभरापूर्वी पतीचाही मृत्यू, दोन मुले झाली अनाथ

झिम्बाब्वेच्या माजी क्रिकेटपटू आणि महिला प्रशिक्षक सिनिकीवे मोफू यांचे निधन
Sinikiwe Mpofu Zimbabwe
Sinikiwe Mpofu ZimbabweEsakal
Updated on

झिम्बाब्वेच्या माजी क्रिकेटपटू आणि महिला प्रशिक्षक सिनिकीवे मोफू यांचे निधन झाले आहे. मोफू फक्त 37 वर्षांच्या होत्या.

मोफूच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, घरी असताना अचानक जमिनीवर कोसळल्या. यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेटमध्ये सिनिकीवे मोफूचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. झिम्बाब्वेच्या महिला संघाने 2006 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि मोफू त्याचा एक भाग होत्या.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सिनिकीवे मोफूवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तिचे पती शेफर्ड माकुनुरा यांचे 15 डिसेंबर रोजी निधन झाले आहे. ते बरेच दिवस आजारी होते. मुकुनुरा हे झिम्बाब्वेचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. आता सिनिकीवे मोफूचाही मृत्यू झाले असून त्यांची दोन मुले अनाथ झाली आहेत.

हे ही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून


मोफू ठरल्या पहिल्या महिला प्रशिक्षक

सिनिकीवे मोफू यांचा जन्म बुलावायो येथे 21 फेब्रुवारी 1985 रोजी झाला. खेळाडू-प्रशिक्षक बनणारी ती पहिली महिला खेळाडू होती.

2020-21 मध्ये त्याच्या प्रशिक्षणाखाली, माउंटेनियर्सच्या संघाने त्याच्या प्रशिक्षणाखाली एकदिवसीय स्पर्धा जिंकली होती. गेल्या वर्षी तिने संघाला अंतिम फेरीत नेले होते आणि ती उपविजेती ठरली होती.

Sinikiwe Mpofu Zimbabwe
IND vs SL 2nd ODI : भारताने श्रीलंकेचा केला 4 विकेट्सनी पराभव; मालिका घातली खिशात

झिम्बाब्वेच्या या माजी खेळाडूच्या निधनाबद्दल तेथील क्रिकेट बोर्डाने शोक व्यक्त केला आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने ट्विट केले की सिनिकीवे मोफू एक उत्कृष्ट प्रशिक्षक आणि दोन मुलांची आई आहे. त्याच्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी हा काळ खूप कठीण आहे.

Sinikiwe Mpofu Zimbabwe
Cristiano Ronaldo: तुमच्या दहा पिढ्यांना पुरेल एवढं क्रिस्तियानोच्या घराचं एका महिन्याचं भाडं, किंमत...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.