Sports Journalists Federation of India : भारतीय क्रीडा पत्रकार महासंघाकडून (SJFI) दिले जाणारे प्रतिष्ठित एसजेएफआय पदक महान क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुवाहाटी येथील वार्षिक सर्वधारण सभेत यावर शिक्कामोर्तब झाला.
टोकियो ओलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करुन नवा इतिहास रचणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि रौप्य पदक विजेती मीराबाई चानू (Mirabai Chanu )यांचीही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. पुरुष गटातून नीरज चोप्राला तर महिला गटातून मीराबाई चानूची वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक विजेत्या हॉकी संघाला (Hockey India) वर्षातील सर्वोत्तम संघ घोषीत करण्यात आले आहे.
वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पदकाचे खाते उघडले होते. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तिने रौप्य पदकाची कमाई केली होती. स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात नीरज चोप्राने सुवर्णमयी इतिहास लिहिला. ऑलिम्पिक स्पर्धेत मैदानी खेळात सुवर्ण पदक मिळवणारा नीरज चोप्रा पहिला खेळाडू आहे. त्याच्यापूर्वी 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्राने सुवर्ण वेध टिपला होता.
पॅरालिम्पिक स्पर्धेतील भालाफेकपटू सुमित अंतिल आणि प्रमोद भगत यांनाही त्यांच्या गटातून सर्वोत्तम कामगिरीबद्दल गौरव करण्यात येणार आहे. या क्रीडा प्रकारात महिला गटातून नेमबाज अवनी लेखरा हिची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आलीये. सर्वसाधारण सभेत केरळच्या ए विनोद यांना एसजेएफआयचे नवे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. मुंबईच्या प्रशांत केनी यांना सचिव तर आसामच्या विद्युत कलिता यांची कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.