Angelo Mathews : 'माझ्या नजरेतून पडला तो...' टाइम आउट झालेल्यानंतर मॅथ्यूजने केलं खळबळजनक विधान

Time Out Controversy Angelo Mathews Statement On Shakib Al Hasan
Time Out Controversy Angelo Mathews Statement On Shakib Al Hasan
Updated on

Time Out Controversy Angelo Mathews Statement On Shakib Al Hasan : वर्ल्ड कपच्या ३८व्या सामन्यात श्रीलंका आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने आले. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यादरम्यान मोठा वाद झाला. श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात टाइम आऊट होणारा तो पहिला फलंदाज ठरला.

या संपूर्ण प्रकरणामध्ये सोशल मीडियावर काही लोक मॅथ्यूजवर आरोप करत आहेत, तर काही लोकांनी बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पण टाइम आउट झालेल्यानंतर मॅथ्यूजने मोठे विधान केले.

सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत मॅथ्यूज म्हणाला की, शाकिब आणि बांगलादेशची कृती अत्यंत लज्जास्पद आहे. त्यांना असे क्रिकेट खेळायचे असेल तर ते अत्यंत लाजिरवाणे आहे. इतर कोणत्याही संघाने हे केले असेल असे मला वाटत नाही. मी त्यांना अपील मागे घेण्यासही सांगितले पण त्यांनी नकार दिला.

मॅथ्यूज पुढे म्हणाला की, 'आजच्या आधी मी शाकिब आणि बांगलादेशचा खूप आदर करायचो पण आता ते माझ्या नजरेतून पडले आहेत. मी वेळ वाया घालवत नव्हतो. मी क्रीजवर असल्याचे सर्वांना दिसत होते पण माझ्या हेल्मेटचा पट्टा तुटला होता.

तो पुढे म्हणाला की, 'मी वेळेवर क्रीजवर पोहोचल्याचे व्हिडिओ पुरावे आमच्याकडे आहेत. मी क्रीजवर पोहोचलो तेव्हा माझ्याकडे अजून पाच सेकंद बाकी होते. यानंतर माझ्या हेल्मेटमध्ये समस्या असल्यास मी काय करू शकतो? हा खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. हेल्मेट न घालता यष्टिरक्षक स्पिनरविरुद्ध विकेट मागे थांबत नसेल तर मी गोलंदाजाचा सामना कसा करू शकतो. अंपायरने मला आऊट देण्यापूर्वी तंत्रज्ञानाचा अवलंब करायला हवा होता. तंत्रज्ञान उपलब्ध असेल तर त्याचा वापर करायला हवा.

सामन्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी बांगलादेशच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही, तेव्हा मॅथ्यूज म्हणाले की, जर कोणताही संघ त्यांचा आदर करत नसेल तर त्यांचा आदर कसा करणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.