Video: पाकिस्तानी बाबर आझमच्या पाठीमागून हल्ला, ज्याने बघितला तो झाला थक्क!

जयसूर्याने बाबर आझमला ज्या पद्धतीने बाद केले ते पाहून सगळेच झाले थक्क
babar azam bowled video prabath jayasuriya
babar azam bowled video prabath jayasuriyaSAKAL
Updated on

Babar Azam : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना गॉलमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून पाचव्या दिवशी पाकिस्तानला विजयासाठी 120 धावा करायच्या आहे. यजमान श्रीलंकेला विजयासाठी सात विकेट्स घ्याच्या आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानचा संघ मजबूत स्थितीत दिसत आहे.

babar azam bowled video prabath jayasuriya
Video: शेवटचा वन-डे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरताच Ben Stokes ला अश्रू अनावर

गॉल कसोटीच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावणाऱ्या बाबर आझमने दुसऱ्या डावातही शानदार अर्धशतक झळकावले. मात्र यावेळी बाबरला श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज जयसूर्याने मोठी खेळी करण्यापासून रोखले. बाबर दुसऱ्या डावातही लय मध्ये दिसत होता. त्याला बाद करण्यासाठी खास गोलंदाजीची गरज होती. श्रीलंकेच्या फिरकीपटूनेही असेच काहीसे केले. जयसूर्याने बाबर आझमला ज्या पद्धतीने बाद केले ते पाहून सगळेच थक्क झाले. जयसूर्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बाबर आझम 55 धावा करून जयसूर्याचा बळी ठरला. चौथ्या दिवशी श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात 337 धावांवर बाद झाला. दिनेश चंडिमल 94 धावा करून नाबाद परतला. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात मोहम्मद नवाजने पाच तर यासिर शाहने तीन बळी घेतले. 342 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली. शफीक आणि इमाम-उल-हक यांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. गुणतालिकेत श्रीलंका तिसऱ्या तर पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.