श्रीसंतला कानाखाली वाजवणे ही माझी चूकच, भज्जीने दिली कबुली

तब्बल १४ वर्षानंतर माजी भारतीय ऑफ स्पिनरन हरभजन सिंहने २००८ मधील चूक कबूल केली.
श्रीसंतला कानाखाली वाजवणे ही माझी चूकच, भज्जीने दिली कबुली
esakal
Updated on

माजी भारतीय ऑफ स्पिनरन हरभजन सिंहने १४ वर्षानंतर केलेल्या एका चुकीची कबुली दिली आहे. २००८ मध्ये केलेल्या चुकीवर त्याने पश्चाताप व्यक्त केला आहे. त्यावेळी मी श्रीसंतला कानशिलात लावायला नको होती. त्या दिवशी जे घडलं ते खुप चुकीच घडलं अशी भावना त्यानं यावेळी व्यक्त केली आहे.

श्रीसंतला कानाखाली वाजवणे ही माझी चूकच, भज्जीने दिली कबुली
'तु वनडे खेळू नकोस', रवि शास्त्रींचा पांड्याला सल्ला

हरभजन सिंग पुढे म्हणाला की, खेळात भावना नेहमीच तुमच्यासोबत असतात, पण त्यावर नियंत्रण ठेवावे लागते. त्या दिवशी जे काही घडले ते माझे चुकले. त्या हंगामात हरभजन सिंग हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू होता, तर श्रीसंत युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाबचा भाग होता.

श्रीसंतला कानशिलात लगाल्याप्रकरणी हरभजन सिंगवर संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती. याशिवाय भज्जीवर ५ एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. हरभजन सिंगने याआधीही अनेक वेळा आपली खंत व्यक्त केली आहे.

एका मुलाखतीत त्याने श्रीसंतवर भाष्य केलं. श्रीसंतने खूप नौटंकी केली होती. मी असं करायला नको हवं होते, ही माझी चूक होती. मी माझ्या चुकांमधून शिकलो आहे. मात्र, मी श्रीशांतला थप्पड मारली नसल्याचे या अनुभवी फिरकीपटूने सांगितले. पण चूक माझीच होती. अशा शब्दात भज्जीने पश्चाताप व्यक्त केला आहे.

श्रीसंतला कानाखाली वाजवणे ही माझी चूकच, भज्जीने दिली कबुली
हरभजन सिंगनं हॉटेल्समधल्या प्लेट्स फोडल्या,पत्नीनंही दिली साथ; काय घडलं?

श्रीसंतने भारतासाठी २७ टेस्ट मॅच व्यतिरीक्त ५३ वनडे आणि १० टी २० खेळले आहेत. श्रीसंतच्या नावावर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये १६९ विकेट्स आहेत. विशेष म्हणजे 2007 मध्ये टी 20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा श्रीसंत भाग होता. याशिवाय 2011 मध्ये भारतीय संघाने 50 षटकांचा विश्वचषक जिंकला तेव्हाही श्रीसंत भारतीय संघाचा भाग होता. या माजी भारतीय वेगवान गोलंदाजाने आयपीएलच्या 44 सामन्यांमध्ये 40 विकेट घेतल्या आहेत. पंजाब किंग्ज व्यतिरिक्त तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.