Smriti Mandhana The Hundred : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड महिला लीग क्रिकेट स्पर्धेत भारताच्या स्मृती मानधनाने आपला अर्धशतकांचा धडाका कायम ठेवला आहे. सदर्न ब्रेवकडून खेळणाऱ्या स्मृती मानधनाने वेल्श फायरविरूद्ध 70 धावांची खेळी केली. ही खेळी तिने 42 चेंडूत केली. या खेळीत स्मृतीने 11 चौकार मारले आहेत. यापूर्वी स्मृतीने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात देखील अर्धशतकी खेळी केली होती.
स्मृती मानधनाने द हंड्रेड महिला लीग स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकी खेळी करणारी फलंदाज झाली आहे. स्पर्धेच्या इतिहासातील ही तिची पाचवी अर्धशतकी खेळी आहे. यापूर्वी स्मृती आणि जेमिमा रॉड्रिग्ज या सर्वाधिक अर्धशतकी खेळी करण्यात बरोबरी होती. या दोघींनी प्रत्येकी 4 अर्धशतकी खेळी केल्या होत्या.
मात्र आता स्मृती मानधनाने जेमिमाहला मागे टाकले आहे. इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील फलंदाज डेनियम वॅटने देखील द हंड्रेड स्पर्धेत 4 अर्धशतकी खेळी केल्या आहेत.
स्मृती मानधनाने द हंड्रेडमध्ये 5 अर्धशतकी खेळ्या केल्या आहेत. याचबरोबर ती द हंड्रेड महिला लीग क्रिकेट स्पर्धेत 500 धावा करणारी पहिली फलंदाज ठरली आहे. 2022 च्या हंगामात तिने सदर्न ब्रेवकडून सर्वाधिक 211 धावा केल्या होत्या. 2021 मध्ये तिने 163 धावा केल्या होत्या. या हंगामात तिने दोन सामन्यात तिने आतापर्यंत 125 धावा केल्या आहेत.
स्मृती मानधनाने दमदार 70 धावा केल्या तरी तिचा संघ सदर्न ब्रेव वेल्श फायरविरूद्धचा हरला. पहिल्यांदा फलंदाजी कऱणाऱ्या वेल्शने 100 चेंडूत 3 बाद 165 धावा ठोकल्या होत्या. सलामीवीर हेली मॅथ्यूजने 65 धावांची खेळी केली. याच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या ब्रेवने दमदार सुरूवात केली.
पहिल्या विकेसाठी स्मृती मानधना आणि वॅटने 58 चेंडूत फक्त 96 धावा केल्या. मात्र वॅट बाद झाल्यानंतर इतर कोणत्या फलंदाजाला स्मृतीला चांगली साथ देता आली नाही. स्मृतीने शेवटपर्यंत किल्ला लढवला. मात्र तिचा संघ 4 धावांनी पराभूत झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.